व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:06 IST2025-12-16T11:04:47+5:302025-12-16T11:06:39+5:30

Vi Phone Insurance Recharge : Vi ने भारतात प्रथमच रिचार्जसोबत फोन चोरी विमा (Handset Theft Insurance) देणारा प्लॅन लाँच केला. फक्त ₹६१ पासून सुरुवात. ₹२५,००० पर्यंतचे कवच.

Vi Phone Insurance Recharge: Vodafone has caught everyone! Phone lost, stolen... Insurance of Rs 25,000 along with recharge, that too for Rs 61... | व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...

व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...

भारतातील दूरसंचार क्षेत्रातील कंपनी 'Vodafone Idea' ने प्रीपेड ग्राहकांसाठी एक मोठी आणि टेलिकॉम इंडस्ट्रीतील प्रथम ऑफर सादर केली आहे. कंपनीने डेटा रिचार्ज प्लॅनसोबत स्मार्टफोन चोरी किंवा हरवल्यास संरक्षण देणारा विमा देण्यास सुरुवात केली आहे.

या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना अवघ्या ६१ रुपयांपासून सुरू होणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये त्यांच्या अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनसाठी २५,००० रुपयांपर्यंतचे विमा कवच मिळणार आहे. पारंपारिक विमा पॉलिसींमध्ये सहसा फक्त 'नुकसानी'साठी विमा असतो, परंतु 'Vi' ने चोरी आणि हरवलेल्या फोनची समस्या दूर करत एक महत्त्वाचा प्रश्न सोडवला आहे.

हा विमा 'आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' यांच्या भागीदारीत दिला जात आहे. ग्राहक त्यांचा रिचार्ज झाल्यानंतर ४८ तासांच्या आत एसएमएसद्वारे आलेल्या लिंकवर नोंदणी करून विमा सक्रिय करू शकतात. ही क्लेम प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल-आधारित असून ती सोपी आणि जलद करण्यात आली आहे.

या ऑफरमुळे, कमी किमतीत स्मार्टफोन संरक्षण उपलब्ध झाले असून, 'Vi' ने बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणात ग्राहकांना व्हॅल्यू-अॅडेड सेवा देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. 
 

प्लॅन किंमत (रु.)डेटा बेनिफिटविमा कवरेजविमा वैधता
६११५ दिवसांसाठी २GBरु. २५,००० पर्यंत३० दिवस
२०१३० दिवसांसाठी १०GBरु. २५,००० पर्यंत१८० दिवस
२५१३० दिवसांसाठी १०GBरु. २५,००० पर्यंत३६५ दिवस (पूर्ण वर्ष)

Web Title : वोडाफोन का धमाका: रिचार्ज पर बीमा, फोन खोने पर कवरेज!

Web Summary : वोडाफोन आइडिया ने ₹61 से शुरू होने वाले चुनिंदा डेटा रिचार्ज पर ₹25,000 तक का बीमा पेश किया है। इसमें स्मार्टफोन की चोरी या गुम होने पर कवरेज शामिल है, जो आदित्य बिड़ला हेल्थ इंश्योरेंस के साथ साझेदारी में टेलीकॉम इंडस्ट्री में पहली बार है। पंजीकरण डिजिटल और सरल है।

Web Title : Vodafone Offers Insurance on Recharge: Phone Loss Covered!

Web Summary : Vodafone Idea now offers insurance up to ₹25,000 on select data recharges, starting at just ₹61. This covers smartphone theft or loss, a first in the telecom industry, in partnership with Aditya Birla Health Insurance. Registration is digital and simple.