Aadhaar Card वर आता सहजरित्या अपडेट करा Address; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 14:58 IST2021-10-23T14:58:15+5:302021-10-23T14:58:37+5:30
आता Aadhaar Card हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. परंतु आता घरबसल्या सहजरित्या तुम्ही तुमचा आधार कार्डवरील पत्ता अपडेट करू शकता.

Aadhaar Card वर आता सहजरित्या अपडेट करा Address; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
ठळक मुद्देआता घरबसल्या सहजरित्या तुम्ही तुमचा आधार कार्डवरील पत्ता अपडेट करू शकता.
आता Aadhaar Card हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. अनेक महत्त्वाच्या योजनांसाठी आता आधार कार्डाची गरज भासते. तसंच आर्थिक व्यवहार करण्यासाठीही पॅन कार्डासोबत आधार कार्डाची अनेकदा गरज भासते.
जर तुमच्या आधार कार्डावरी तुमचा अॅड्रेस चुकीचा झाला असेल किंवा तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असेल तर सहजरित्या तुम्ही तो आता बदलू शकता. पाहूया कशा प्रकारे तुम्ही तुमचा पत्ता आता अपडेट करू शकाल.
अशाप्रकारे बदला तुमचा पत्ता
- सर्वप्रथम तुम्ही UIDAI च्या ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉग इन करा.
- त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या 'Proceed to Update Aadhaar' यावर क्लिक करा.
- यानंतर तुमचा १२ अंती UID क्रमांक एन्टर करा.
- त्या ठिकाणी देण्यात आलेल्या कॅप्चा अथवा सिक्युरिटी कोड एन्टर करा.
- सिक्युरिटी कोड एन्टर केल्यानंतर तुम्हाला ओटीपीचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- ही प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या आधार कार्डासोबत रजिस्टर असलेल्या नंबरवर तुम्हाला एक ओटीपी मिळेल.
- ओटीपी टाकून एन्टर करा आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचे डिटेल्स पाहायला मिळतील. तुम्हाला पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक असलेल्या ३२ डॉक्युमेंट्सपैकी कोणतंही एक ID अॅड्रेस प्रुफ सिलेक्ट करून सबमिट करा.