मास्टरस्ट्रोक! Micromax आणखी एक स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 09:40 AM2020-11-28T09:40:23+5:302020-11-28T09:41:20+5:30

Micromax Re-entry : दोन बजेट फोन लाँच करत चिनी कंपन्यांना शह देण्याचा प्रयत्न Micromax ने केला.

Masterstroke! Micromax ready to bring another cheap phone; Micromax In 1b Go edition | मास्टरस्ट्रोक! Micromax आणखी एक स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत

मास्टरस्ट्रोक! Micromax आणखी एक स्वस्त फोन आणण्याच्या तयारीत

googlenewsNext

मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने याच महिन्यात भारतीय बाजारात पुन्हा एन्ट्री केली आहे. दोन बजेट फोन लाँच करत चिनी कंपन्यांना शह देण्याचा प्रयत्न Micromax ने केला. आता आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीला मायक्रोमॅक्स लागली आहे. 


माय़क्रोमॅक्सचा हा फोन अँड्रॉईड गो ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असणार आहे.  या फोनचे नाव Micromax In 1b Go edition असण्याची शक्यता आहे. या फोनची टक्कर रियलमी, शाओमी या कंपन्यांच्या स्वस्त ब्रँडसोबत होणार आहे. 
गॅजेट ३६० नुसार हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होईल. 2GB RAM + 32GB आणि 4GB RAM + 64GB व्हेरिअंटमध्ये असेल. या फोनबाबत सध्या एवढीच माहिती उपलब्ध आहे. 


Micromax In 1B 
Micromax In 1B ची किंमत खूपच परवडणारी ठेवण्यात आली आहे. 6.5 इंचाचा HD+ रिझोल्युशन डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. माठीमागे 13 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. टाईप सी चार्जिंग कनेक्टिविटी देण्यात आली आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. 

Micromax In Note 1 देखील बाजारात
Micromax In Note 1 मध्ये 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रिझोल्युशनसह देण्यात आला आहे. हे डिव्हाईस MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. गेमिंग करणाऱ्या युजरसाठी तो चांगला परफॉर्मन्स देतो. कॅमेरा सेटअप- AI क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 5 एमपी अल्ट्रा वाईड, २ एमपी मॅक्रो आणि २ एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 5000एमएएच बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली असून महत्वाचे म्हणजे अँड्रॉईड 11 आणि 12 अपडेट देण्य़ात येणार आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

Web Title: Masterstroke! Micromax ready to bring another cheap phone; Micromax In 1b Go edition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.