Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि स्मार्ट शहरे यांचे नाते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 18:42 IST2026-04-26T18:42:15+5:302026-04-26T18:42:42+5:30

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: माहिती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा त्याचा खरा उद्देश असतो.

lokmat ai series the relationship between artificial intelligence and smart cities | Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि स्मार्ट शहरे यांचे नाते!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय आणि स्मार्ट शहरे यांचे नाते!

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आपण ज्या शहरात राहतो, लहानचे मोठे होतो, शाळेत जातो, खेळतो आणि ज्या बाजारात खरेदी करतो ते शहर जर तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुरक्षित, स्वच्छ, वेगवान आणि सोयीस्कर झाले तर त्याला स्मार्ट शहर म्हणतात. स्मार्ट शहर म्हणजे फक्त उंच इमारती किंवा मोठे रस्ते नव्हे; तर माहिती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा त्याचा खरा उद्देश असतो.

भारत सरकारने २०१५ साली स्मार्ट सिटीज मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेत अनेक शहरांची निवड करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्मार्ट शहर कसे काम करते?

स्मार्ट शहरात सेन्सर, इंटरनेट, कॅमेरे, डेटा सेंटर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांचा वापर केला जातो. हे सगळे मिळून शहरातील माहिती गोळा करतात आणि त्यावर विश्लेषण करतात.

उदाहरणार्थ - स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल : रस्त्यावर किती गाड्या आहेत हे सेन्सर ओळखतात. जर एका बाजूला जास्त वाहतूक असेल तर सिग्नलचा वेळ आपोआप वाढवला जातो. त्यामुळे ट्रॅफिक जॅम कमी होतो.

स्मार्ट लाइट्स : रस्त्यावर कोणी नसताना दिवे मंद होतात किंवा बंद होतात. त्यामुळे वीज वाचते. तसेच विविध कामांसाठी येत्या काळात एआय वापरला जातो.

स्मार्ट पाण्याचे व्यवस्थापन : पाण्याची गळती कुठे होतं आहे, कुठल्या विभागात कमी-जास्त पाणी मिळतेय हे तंत्रज्ञानाने लगेच समजते.

कचरा व्यवस्थापन :  कचरापेटीत सेन्सर बसवलेले असतात. ती भरली की नगरपालिकेला संदेश जातो.

सुरक्षित आणि स्वच्छ शहर

स्मार्ट शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोपे होते. तसेच, ऑनलाइन तक्रार प्रणालीमुळे नागरिक थेट प्रशासनाशी संपर्क साधू शकतात. स्वच्छतेसाठी स्मार्ट मशीन, यांत्रिक रस्ते स्वच्छता यंत्रे आणि कचऱ्याचा पुनर्वापर यावर भर दिला जातो. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असते.

डिजिटल सेवा

स्मार्ट शहरात बहुतेक सेवा ऑनलाइन उपलब्ध असतात. वीज बिल, पाणी बिल, मालमत्ता कर, शाळेची माहिती हे सर्व मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर मिळते. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतात.

विद्यार्थ्यांची भूमिका

शहरे स्मार्ट करण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून, तर ती जबाबदारी नागरिकांचीही आहे. मुलांनी पाणी वाचवणे, कचरा योग्य ठिकाणी टाकणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. भविष्यातील वैज्ञानिक, अभियंते आणि प्रशासक म्हणून तुम्हीच पुढे स्मार्ट शहर अधिक प्रगत कराल. स्मार्ट शहर म्हणजे तंत्रज्ञान आणि जबाबदारी यांचा सुंदर संगम आहे. शहर तेव्हाच खऱ्या अर्थाने स्मार्ट होते, जेव्हा त्यातील लोकही जागरूक आणि सजग असतात.

Smart Tech

A smart city uses technology like sensors, internet, and AI to make life easier, safer, and cleaner for people. It helps manage traffic, save electricity and water, improve security, and provide fast digital services. Technology makes a city smart, but good citizens make it great.

- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)
 

Web Title : लोकमत एआई: एआई और स्मार्ट शहरों का संबंध

Web Summary : स्मार्ट शहर कुशल जीवन के लिए एआई और तकनीक का उपयोग करते हैं। सेंसर, डेटा विश्लेषण और डिजिटल सेवाएं यातायात को बेहतर बनाती हैं, संसाधनों का संरक्षण करती हैं, सुरक्षा बढ़ाती हैं और ऑनलाइन पहुंच प्रदान करती हैं। एक सच्चे स्मार्ट और प्रगतिशील शहरी वातावरण के लिए नागरिकों की जिम्मेदारी महत्वपूर्ण है।

Web Title : Lokmat AI: Exploring the Connection Between AI and Smart Cities

Web Summary : Smart cities use AI and tech for efficient living. Sensors, data analysis, and digital services improve traffic, conserve resources, enhance safety, and provide online access. Citizen responsibility is key to a truly smart and progressive urban environment.