jio subscribers who have already purchased a plan are not required to pay any extra iuc clarifies jio | जिओ अलर्ट! फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार?, जाणून घ्या

जिओ अलर्ट! फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार?, जाणून घ्या

ठळक मुद्देजिओ युजर्सने केलेला रिचार्ज प्लॅन संपल्यानंतरच त्यांना IUC चार्जेस द्यावे लागणार आहेत.प्लॅन अ‍ॅक्टिवेट असेपर्यंत फ्री कॉलिंगची सुविधा असणार आहे. जिओने 10 रुपयांपासून 100रुपयांपर्यंत टॉप-अप वाउचर इंट्रोड्यूस केले आहेत.

नवी दिल्ली - दिवाळीआधी रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना दणका दिला आहे. कॉल टर्मिनेशन चार्जशी संबंधीत नियमांमुळे जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे जिओ युजर्सना आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी ही सुविधा मोफत देण्यात आली होती. मात्र फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार असा प्रश्न अनेक युजर्सना पडला होता. जिओने आता या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. 10 ऑक्टोबरनंतर लागू करण्यात येईल अशी माहिती याआधी जिओने आपल्या युजर्सना दिली होती. मात्र आता याबाबत ट्वीट करून जिओने नवीन अपडेट दिलं आहे. युजर्सने केलेला रिचार्ज प्लॅन संपल्यानंतरच त्यांना IUC चार्जेस द्यावे लागणार आहेत. प्लॅन अ‍ॅक्टिवेट असेपर्यंत फ्री कॉलिंगची सुविधा असणार आहे. 

जिओने दिलेल्या माहितीनुसार, '9 ऑक्टोबर किंवा त्याधी कोणताही प्लॅनसाठी जिओ नंबरवर रिचार्ज  केला असल्यास तो प्लॅन संपेपर्यंत (जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कवर देखील) फ्री कॉलिंगची सुविधा युजर्सना मिळणार आहे.' त्यामुळेच युजर्सना जिओ प्लॅनची व्हॅलिडीटी चेक करावी लागणार आहे. ती संपल्यानंतर वेगळा आययूसी टॉप-अप रिचार्ज करावा लागणार आहे. जिओने 10 रुपयांपासून 100रुपयांपर्यंत टॉप-अप वाउचर इंट्रोड्यूस केले आहेत. 10 रुपयांच्या प्लॅनवर 1 जीबी आणि 100 रुपयाच्या रिचार्जवर 10 जीबी अ‍ॅडिशनल डेटा युजर्सना मिळणार आहे. 

व्होडाफोन-आयडिया आता आपल्या युजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे. Vodafone Idea Limited (VIL) ने गुरुवारी (10 ऑक्टोबर) IUC संबंधीत एक मोठी घोषणा केली आहे. युजर्सना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस (IUC) लागणार नसल्याची माहिती व्होडाफोन-आयडियाने दिली आहे. कंपनीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा आनंद घ्या. व्होडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर फ्री कॉल' असं ट्वीट व्होडाफोनने केलं आहे. व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये सुरुवातीचा प्रीपेड प्लॅन 119 रुपयांचा आहे. 28 दिवस व्हॅलिडीटी, 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा या प्लॅनमध्ये मिळते. 

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी खास ऑफर्स आणत असतं. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. जिओने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्सना आपल्या युजर्सद्वारे अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर मोबाईल फोन कॉल्ससाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हे चार्जेस युजर्सने दुसऱ्या जिओ युजर्सला कॉल केला असेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य प्लॅटफॉर्मवरून कॉल केल्यास लागू होणार नाहीत. 2017 मध्ये ट्रायने इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC) 14 पैशांवरून 6 पैसे प्रति मिनिट केले होते. तसेच जानेवारी 2020 मध्ये हे संपेल असं सांगितलं होतं. त्यानंतर आता जिओने आउटगोइंग कॉलसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं आहे. 

जिओवरुन व्हाईस कॉलिंग सेवा मोफत देण्यात येत असल्याने कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या अर्थात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना ट्रायच्या नियमानुसार 13, 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागत होती. त्यामुळे आता जिओने ट्रायच्या नियमांपासून वाचण्यासाठी अन्य नेटवर्कवर कॉलिंग सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच इन्कमिग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र याची भरपाई कंपनी तेवढ्याच पैशात मोफत इंटरनेट डेटा देणार असल्याची माहिती जिओने दिली आहे. 

 

Web Title: jio subscribers who have already purchased a plan are not required to pay any extra iuc clarifies jio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.