शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

WhatsApp वर आता असे पाठवा हाय-क्वालिटी फोटो; 'या' सोप्या ट्रिक्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 6:11 PM

How to send original quality images on Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप फाईल वेगाने ट्रान्सफर करण्यासाठी आपोआप 70 टक्क्यांपर्यंत इमेज क्वालिटीला कम्प्रेस करते.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपपैकी एक आहे. युजर्सला यावरून मेसेज पाठवण्यासोबतच फोटो, व्हिडीओ आणि इतर फाईल्स देखील पाठवता येतात. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र, युजर्सला अद्याप व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हाय-क्वालिटी फोटो पाठवता येत नाही. जुलैमध्ये कंपनीने इमेज कंप्रेशनमध्ये बदल करण्याचे काही संकेत दिले आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप फाईल वेगाने ट्रान्सफर करण्यासाठी आपोआप 70 टक्क्यांपर्यंत इमेज क्वालिटीला कम्प्रेस करते. यामुळे युजर्सच्या मोबाईल डेटाची बचत होते. मात्र जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे फोटो शेअर करायचे असतील तर अशावेळी याचा उपयोग होत नाही. पण काही सोप्या ट्रिक्सद्वारे तुम्ही समोरील युजर्सला ओरिजिनल क्वालिटीमध्ये फोटो पाठवू शकता. ओरिजिनल क्वालिटीमध्ये फोटो कसे पाठवू शकता, याबाबत जाणून घेऊया...

व्हॉट्सअ‍ॅपवर असे पाठवा हायक्वालिटी फोटो

- सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅपवर ज्या कॉन्टॅक्टला फोटो पाठवायचा आहे ते ओपन करा.

- चॅट स्क्रीनमध्ये तुम्हाला खाली कॅमेरा आयकॉनच्या बाजूला एक पेपर क्लिक सारखे चिन्ह दिसेल.

-  पेपर क्लिप चिन्हावर क्लिक केल्यानंतर इतर चिन्ह दिसतील.

- आता डॉक्यूमेंट्स पर्यायावर क्लिक करा.

- आता जे फोटो डॉक्यूमेंट्स स्वरूपात पाठवायचे आहे ते फोटो निवडा.

- जर तुम्हाला फोटो सापडत नसतील तर 'Browse other docs' पर्यायावर टॅप करा.

- येथून तुम्ही तुम्हाला हवा असलेला फोटो निवडू शकता व त्यानंतर सेंड बटणावर क्लिक करा.

- तुम्ही पाठवलेल्या डॉक्यूमेंट्सच्या साईज व इंटरनेट स्पीडनुसार फाईल सेंड होण्यास वेळ लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान