google brings paper phone to tackle smartphone addiction | भारीच! मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी गुगलने आणला पेपर फोन

भारीच! मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी गुगलने आणला पेपर फोन

ठळक मुद्देगुगलने स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी पेपर फोन आणला आहे. पेपर फोन हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेलं ओपन सोर्स अ‍ॅप आहे.पेपर फोन आपल्या गरजेनुसार पर्सनल बुकलेट प्रिंट करून देतो.

नवी दिल्ली - स्मार्टफोन जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. अनेकांना स्मार्टफोनची इतकी सवय असते की फोन शिवाय त्यांना करमत नाही. स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. फोनचा अतिवापर केल्यास त्याचा परिणाम हा आरोग्यावरही होतो. गुगलने स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी पेपर फोन आणला आहे. पेपर फोन हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेलं ओपन सोर्स अ‍ॅप आहे. गुगलने आपल्या ब्लॉगवर याबाबतची माहिती दिली आहे. 

पेपर फोन ओपन सोर्स अ‍ॅप असल्याने त्याचा वापर करता येतो. तसेच स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी हे अ‍ॅप मदत करतं. Github वर या अ‍ॅपचा कोड उपलब्ध आहे. गिटहब ही मायक्रोसॉफ्टची सहयोगी कंपनी व जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. पेपर फोन अ‍ॅपमध्ये युजर्स कॉन्टक्ट्स, मॅप यासारख्या हव्या असलेल्या आणि आवश्यक गोष्टी समाविष्ट करता येतात. यापैकी कोणत्या गोष्टीचा वापर आपल्याला करायचा आहे, त्या गोष्टीची प्रिंट पेपर फोन अ‍ॅप काढतो. 

पेपर फोनचा मुख्य उद्देश हा लोकांना स्मार्टफोनपासून दूर ठेवणे हा आहे. हे अ‍ॅप युजर्सना जास्तीत जास्त कामे पेपरच्या माध्यमातून करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. स्मार्टफोनवर खूपच वेळ जातो. तंत्रज्ञान वापराचा समतोल आपल्याला राखता येत नाही. अनेक युजर्सना याची जाणीव असते. मात्र हा समतोल कसा राखायचा याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. पेपर फोन अ‍ॅप हे त्यावरील उत्तर आहे. पेपर फोन आपल्या गरजेनुसार पर्सनल बुकलेट प्रिंट करून देतो. त्यामुळे युजर्सना डिजिटल जगापासून लांब राहता येतं. हा छोटासा प्रयोग लोकांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्यास मदत करेल असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे.

लई भारी! आपण फक्त बोलायचं, गुगल टाईप करणार; कसं ते जाणून घ्या

गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन आहे. गुगलने स्मार्टफोन्स व्यतिरिक्त आता आपले एक खास व्हॉईस रेकॉर्डिंग अ‍ॅप आणले आहे. 15 ऑक्टोबर रोजी गुगलने Pixel 4 सीरीजचे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या फोनमध्ये हे अ‍ॅप देण्यात आले असून त्यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहे. हे अ‍ॅप इतर अ‍ॅपपेक्षा वेगळे आहेत. गुगलने या नव्या अ‍ॅपचं नाव Recorder असं ठेवलं आहे. Recorder अ‍ॅपच्या मदतीने ऑडिओनुसार टेक्स्ट टाईप होणार आहे.

आर्टिफिशल इंटेलिजेन्सच्या मदतीने हे अ‍ॅप काम करणार आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग्स हे आर्टिफिशल इंटेलिजेन्सने रियल टाईममध्ये ट्रान्सक्राइब (ऑडिओ टेक्स्टमध्ये बदलणार) करणार आहे. हे स्पीच प्रोसेससिंग आणि रिकॉग्निशनवर काम करतं. यामुळे लवकरच युजर्सच्या फोनमधील व्हॉईस रेकॉर्डिंगचा अनुभव बदणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स अगदी सहजपणे रेकॉर्डिंग्स टेक्स्टमध्ये काही मिनिटांत बदलू शकतात. मीटिंग, लेक्चरमध्ये याचा वापर होणार आहे. 

 

Web Title: google brings paper phone to tackle smartphone addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.