धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:33 IST2026-04-21T15:32:42+5:302026-04-21T15:33:53+5:30
MP Reel Stunt Accident: जीवघेणा स्टंट आणि अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
MP Reel Stunt Accident: सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये एकाच दुचाकीवर बसून रील बनवत असताना झालेल्या अपघातात तीन सख्ख्या चुलत भावांचा अंत झाला आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका दुचाकीवर तीन तरुण स्वार आहेत. मागे बसलेला एक तरुण हातामध्ये कट्टा (गावठी रिव्हॉल्व्हर) घेऊन ते हवेत नाचवताना दिसत आहे आणि आपला धाक जमवण्याचा प्रयत्न करत आहे. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने आपला चेहरा कपड्याने झाकलेला होता. तो इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करत आणि नागमोडी (Zig-zag) पद्धतीने दुचाकी चालवून स्टंट करत आहे. दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी समोरून येणाऱ्या वाहनावर किंवा रस्त्याच्या कडेला आदळते. हा अपघात इतका भीषण होता की, तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
📍Mauganj, Madhya Pradesh: Three youths riding a motorcycle without helmets, one holding a country-made pistol while their friends filmed from another bike, rammed into a stationary truck on NH-135. All three lost their life on the spot. pic.twitter.com/ddNjMlgcG4
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) April 19, 2026
प्रसिद्धीचा हव्यास जीवावर बेतला
हे तरुण इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रील रेकॉर्ड करत होते. व्हिडिओमध्ये त्यांचा उत्साह दिसत आहे, पण त्याच उत्साहात त्यांनी वाहतुकीचे नियम आणि स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. अपघाताच्या काही सेकंद आधीचा हा व्हिडिओ आता त्यांच्या मृत्यूचा पुरावा ठरला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तरुणांना आणि पालकांना कडक इशारा दिला आहे. रस्त्यावर स्टंट करणे हे केवळ बेकायदेशीरच नाही, तर जीवघेणेही आहे असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.