शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजनाचे बजेट कोलमडणार; DTH, केबलसाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे

By हेमंत बावकर | Updated: February 6, 2019 20:16 IST

पहिल्या 100 चॅनेलसाठी 130 रुपये अधिक जीएसटी असे 154 रुपये मोजावे लागणार असले तरीही त्या चॅनेलमध्ये एकही चॅनेल पाहिला जात नाही.

- हेमंत बावकर

मुंबई : केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये एकीकडे मध्यमवर्गीयांना दिलासा दिलेला असताना दुसरीकडे मात्र ट्रायच्या नियमांमुळे मनोरंजनाचे मासिक बिल जवळपास तिप्पटीने मोजावे लागणार आहे. DTH, केबलवर पसंतीचे चॅनेल निवडीचा निर्णय वरवर योग्य जरी वाटत असला तरीही तो खिसा रिकामा करणारा असल्याचे स्पष्ट होत आहे. 


पहिल्या 100 चॅनेलसाठी 130 रुपये अधिक जीएसटी असे 154 रुपये मोजावे लागणार असले तरीही त्या चॅनेलमध्ये एकही चॅनेल पाहिला जात नाही. यामुळे जर तुम्ही मराठीचे सर्व चॅनेल काही कारटून चॅनेल असे पकडून अंदाजे 15 ते 20 चॅनेल जरी निवडले तरीही तुम्हाला आधीसारखेच भरमसाठ चॅनेल एवढे पैसे मोजावे लागणार आहेत. शिवाय हिंदी मनोरंजन आणि सिनेमाचे चॅनेलसाठी पुन्हा वेगळी खरेदी करावी लागणार आहे. असे एकूण 30 ते 40 चॅनेल जरी निवडले तरीही महिन्याला 300 ते 350 रुपये येणारे बिल आरामात 500 ते 600 रुपयांवर जाणार आहे. 


केबल चालकांनी ग्राहकांना एफटीएमध्ये 100 चॅनेलची यादी दिली आहे. तसेच पसंतीच्या चॅनेल निवडीसाठी फॉर्म दिला आहे. खाली दिलेला फॉर्म हा मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये केबल सेवा देणाऱ्या पुरवठादाराचा आहे. यामध्ये मराठीच्या 9 चॅनेलसाठी 80 रुपये आणि 18 टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे. यामध्ये हिंदी, स्पोर्टस्, किड्स आणि म्युझिकचा कोणताही चॅनेल घेतलेला नाही. 


आपल्या घरामध्ये लहान मुलापासून वृद्धांपर्यंत किमान 4 ते 5 जण असतात. यामुळे त्यांची पसंत वेगवेगळी असते. गृहीणींना मालिका, लहान मुलांना कारटून, तरुणांना खेळ- सिनेमा, वृद्धांना धार्मिक चॅनेल हवे असतात. हे एकत्रित प्रकेज याआधी 300 ते 400 रुपयांत मिळत होते. मात्र, आता नव्या नियमांनुसार चॅनेल निवडल्यास हा खर्च 500 ते 700 रुपयांवर जाणार आहे. यामुळे ग्राहकांमध्ये आधीच संभ्रम असून नाराजीही आहे. पहिल्या 100 चॅनेलमध्ये पाहण्यासारखे चॅनेलच नसतील तर त्यासाठी 154 रुपयांची नेटवर्क कॅपॅसिटी फी म्हणून का द्यावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आजपासून DTH चे नियम बदलले...कशी कराल मनपसंत चॅनेलची निवड?

...तर केबल, डीटीएच बंद करण्याचा पवित्रा
दर महिन्याला येणारा 300 ते 400 रुपयांचा खर्च 500 ते 700 रुपयांवर जाणार असेल तर एवढे पैसे मोजण्यापेक्षा केबल, डीटीएच बंद केलेले बरे, अशा मतापर्यंत ग्राहक आलेला आहे. शिवाय घरी इंटरनेट, वायफाय कनेक्शन असेल तर या चॅनलच्या ब्रॉडकास्टर्स अ‍ॅप किंवा काही कंपन्यांच्या अ‍ॅपवर मोफत या मालिका, चॅनेल पाहता येतात. तसेच 3 ते 4 हजारात मिळणारी छोटी उपकरणे साध्या एलईडी टीव्हीला जोडल्यास टीव्ही स्मार्ट बनविता येतो. यावर अ‍ॅपद्वारे मालिका, चॅनेल पाहता येतात, असेही काही ग्राहकांनी सांगितले. 

टॅग्स :DTHडीटीएचTelevisionटेलिव्हिजनTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय