शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचारी भरती थांबवली

By admin | Updated: June 18, 2014 00:50 IST

ग्रामविकास खात्याचे आदेश: रिक्त पदांची संख्या वाढणार

 सोलापूर: लोकसभेनंतर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या निमित्ताने स्थगित केलेली जिल्हा परिषदांच्या कर्मचारी भरतीची कार्यवाही थांबविण्याचे आदेश ग्रामविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जि.प.च्या जागा वर्षभरासाठी तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भरण्याचे अधिकार जिल्हा परिषद प्रशासनाला आहेत. त्यासाठी राज्य शासनाने १७ डिसेंबर २००९ मध्ये वेळापत्रक निश्चित करुन दिले होते. त्यानुसार पुढील वर्षीच्या एप्रिलपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची यावर्षीच्या मे महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाते. या आदेशानुसार रिक्त होणारी सर्व पदे सुरुवातीची काही वर्षे भरण्यात आली. परंतु यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडू लागल्याने रिक्त पदांच्या तीन टक्के पदे भरण्याचे आदेश शासनाने काढले. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांची संख्या वरचेवर वाढत आहे. रिक्त पदांची संख्या वाढू लागल्याने कामकाजावर कमालीचा परिणाम होऊ लागल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाकडून शासनाकडे गेल्या होत्या. ५ जून २०१४ च्या शासन आदेशान्वये तीन टक्के पद भरतीची कमाल मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. याशिवाय तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचारी भरती मेऐवजी जुलै महिन्यात करण्याचे वेळापत्रक शासनाने २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदांना दिले होते. त्यानंतर राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. या कालावधीत कर्मचारी भरतीची जाहिरात द्यावी किंवा कसे, अशी विचारणा जिल्हा परिषदांकडून झाली होती. त्यावर शासनाने भरती प्रक्रिया थांबविण्याचे आदेश सोमवारी (दि.१६ जून) काढण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यातील आदिवासी क्षेत्राकरिता पद भरतीचे निकष राज्यपालांकडून ९ जून २०१४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे विहित करण्यात आले आहेत. यामुळे पद भरतीचे निकष किमान आदिवासी क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे.---------------------------------आता भरती शक्य आहे का?अगोदर रिक्त होणाऱ्या पदांच्या तीन टक्के पदे दरवर्षी भरण्याचे आदेश शासनाने काढले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुका लक्षात घेता रिक्त होणाऱ्या पदांच्या तीन टक्के पदे भरण्याची अट शिथिल केली असली तरी आता पदे भरण्याचा निर्णय थांबविला आहे. जाहिरात देणे, अर्ज मागविणे, परीक्षा घेणे व पात्र उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेला किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी हे शक्य होणार का?, असा प्रश्न आहे. ------------------------------शासनाच्या आदेशानुसार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पदे भरण्यात येणार नाहीत. जि.प.कडील कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येणारी पदे आमच्या पातळीवर भरण्यात येतील.-प्रभू जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(प्र)