शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
3
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
4
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
5
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
6
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
7
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
8
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
9
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
10
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
11
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
12
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
13
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
14
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
15
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
16
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
17
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
18
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
19
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
20
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल भक्त आणि तिरुपतीच्या भाविकांचा प्रवास सुकर होणार, पंढरपूर-तिरुपती रेल्वेला कायमस्वरूपी मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:59 IST

पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे कायमस्वरूपी नियमित चालविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे चार राज्यातील भाविकांना दिलासा मिळणार आहे.

Pandharpur Tirupati Special Train: प्रवाशांच्या वाढत्या मागणीनंतर भारतीय रेल्वेनेपंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे कायमस्वरूपी नियमित चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आणि तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर मंदिर यादरम्यानची रेल्वे सुविधा अधिक सक्षम होणार आहे.

सध्या विशेष रेल्वे म्हणून धावणाऱ्या गाड्यांना आता नियमित गाडी क्रमांक देण्यात आले आहेत. तिरुपती-पंढरपूर विशेष रेल्वे (क्र. ०७०१२) ही १६ मे २०२६ पासून नियमित रेल्वे (क्र. १७४३७) म्हणून धावणार आहे. 

पंढरपूर-तिरुपती विशेष रेल्वे (क्र. ०७०३२) ही १७ मे २०२६ पासून नियमित रेल्वे (क्र. १७४३८) म्हणून सुरू राहणार आहे. तिरुपती-पंढरपूर साप्ताहिक रेल्वे प्रत्येक शनिवारी दुपारी ४ वाजता तिरुपती येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. 

कोणत्या स्थानकांवर थांबणार?

पंढरपूर-तिरुपती रेल्वे प्रत्येक रविवारी रात्री ८ वाजता पंढरपूर येथून सुटून पुढील दिवशी रात्री ११:३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. ही रेल्वे मोडनिंब, कुडूवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर, बीदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेठ, सिकंदराबाद, काचीगुडा, शादनगर, महबूबनगर, गडवाल, कुर्नूल सिटी, धोन, गुट्टी, तडीपत्री, कडप्पा, रेनीगुंटा आदी स्थानकांवर थांबा घेणार आहे.

नव्या गाड्यांचे वेळापत्रक

तिरुपती-पंढरपूर विशेष रेल्वे आता क्र. १७४३७ या क्रमांकाने नियमित धावणार असून १६ मे २०२६ पासून सेवा सुरू होईल. ही रेल्वे शनिवारी दुपारी ४ वाजता तिरुपतीहून सुटेल.

पंढरपूर-तिरुपती विशेष रेल्वे आता क्र. १७४३८ या क्रमांकाने १७ मे २०२६ पासून नियमित धावणार आहे. ही रेल्वे प्रत्येक रविवारी रात्री ८ वाजता पंढरपूरहून सुटणार आहे.

चार राज्यांना होणार लाभ

या साप्ताहिक रेल्वेमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. मोडनिंब, कुडूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, उदगीर, बीदर, सिकंदराबाद, कुर्नूल सिटी, कडप्पा आदी महत्त्वाच्या स्थानकांवर या रेल्वेचा थांबा असणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pandharpur-Tirupati Train Permanent: Relief for Vitthal and Venkateswara Devotees

Web Summary : Indian Railways permanently approves Pandharpur-Tirupati weekly train due to high demand. This benefits devotees from Maharashtra, Karnataka, Telangana, and Andhra Pradesh, enhancing connectivity between the temples. Existing special trains will be regularized with new numbers and schedules, starting May 2026, stopping at key stations.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेPandharpurपंढरपूरtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटrailwayरेल्वे