शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचा दहावीचा निकाल ८९.३७ टक्के

By admin | Updated: June 18, 2014 00:47 IST

सेंट जोसेफची आर्शिया चौधरी जिल्ह्यात पहिली तर सांगोल्याचा पंकज सुतार दुसरा

सोलापूरचा दहावीचा निकाल ८९.३७ टक्केसेंट जोसेफची आर्शिया चौधरी जिल्ह्यात पहिली तर सांगोल्याचा पंकज सुतार दुसरासोलापूर : पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा सोलापूर जिल्ह्याचा निकाल ८९.३७ टक्के इतका लागला असून, या परीक्षेत गेल्या वर्षीप्रमाणेच मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेत सेंट जोसेफ प्रशालेची आर्शिया युन्नूस चौधरी हिने ९७.८० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात आणि मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर सांगोला येथील सांगोला विद्यामंदिरचा पंकज दिनकर सुतार यांने ९७.६० टक्के गुण मिळवून दुसरा तसेच बी. एफ. दमाणी हायस्कूलचा श्रेयस सारडा व सांगोला विद्यामंदिरचा प्रथमेश बाबर यांनी अनुक्रमे ९७.४० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे.दहावीच्या परीक्षेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ९११ शाळांमधून ५९,४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ५९,१४३ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी ५२,८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे शेकडा प्रमाण ८९.३७ टक्के इतके आहे.सोलापूर जिल्ह्यातून या परीक्षेसाठी ३३,७३६ मुलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३,५७२ मुले प्रत्यक्ष परीक्षेला बसली. त्यातील २९,३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णाचे शेकडा प्रमाण ८७.३१ टक्के इतके आहे. तर २५,६७२ मुलींनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,५७१ मुली प्रत्यक्ष परीक्षेला बसल्या. त्यातील २३,५४३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्णाचे हे शेकडा प्रमाण ९२.०७ टक्के इतके आहे.जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रावीण्यमध्ये ११,१८४, प्रथम श्रेणीत १८,६४४, द्वितीय श्रेणीत १८,०९१ तर ४९३५ विद्यार्थी पास श्रेणीत आहेत.जुन्या अभ्यासक्रमानुसार ६७२८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ६६८९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यपैकी ७५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णाचे शेकडा प्रमाण ११.४७ टक्के इतके आहे.