शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ठराव

By admin | Updated: June 17, 2014 01:28 IST

कृषी सभापती : राज्यातील सर्व जि.प.नी ठराव करावेत

सोलापूर: वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करण्याचा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी ठराव करुन केंद्राकडे पाठवावा, असे आवाहन सभापती जालिंधर लांडे यांनी केले आहे.सोलापूर जि.प. कृषी समितीची बैठक सभापती लांडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. आयुष्यभर शेतीवर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना वृद्धत्व आल्यानंतर सांभाळ करणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे पोटाला अन्न मिळणे कठीण होत आहे. असे असल्याने वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी, असा ठराव सभापती लांडे यांनी मांडला. हा ठराव सर्वच सदस्यांनी एकमताने मंजूर केला. अशाच पद्धतीचे ठराव प्रत्येक जि.प. कृषी समितीने करावे व केंद्र सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन सभापती लांडे यांनी केले आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून विहिरीसाठी मिळालेल्या ९ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. परंतु विहिरीसाठी अवघे एक लाखाचे अनुदान मिळत असून ते तीन लाखांचे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.---------------------------सामूहिक शेततळ्याचे निकष बदलासामूहिक शेततळ्यासाठी किमान २० हेक्टर फळबाग, (१०० बाय १०० बाय ३ मीटर) असलेल्या शेतकऱ्यांना २० लाखांचे अनुदान देण्याचा शासनाचा आदेश आहे. किमान ५ हेक्टरपासून व लहान साईजचे शेततळे शिवाय अन्य पिकांसाठीही शेततळे मंजूर करावे, असा ठराव कृषी समितीच्या बैठकीत झाला. ---------------------------औषध खरेदी व दुरुस्ती कामात पारदर्शकतापशुसंवर्धन समितीच्या बैठकीत जनावरांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या औषध खरेदीची ठेकेदाराकडून वेळेत देण्यासाठी बाँडवर हमी घेण्यात येणार आहे. वेळेत औषधे पुरवली नाहीत तर दंड केला जाणार आहे. दवाखाने दुरुस्तीच्या कामासाठीच्या प्रस्तावावरही पाहणी करुन गरज असेल तरच मंजुरी देण्यात येणार आहे. उगीच अनुदान खर्ची टाकण्यासाठी दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली जाणार नाही, असे सभापती जालिंधर लांडे यांनी सांगितले.------------------------नोकरदारांना सेवानिवृत्त होईपर्यंत पगार असतो व सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळते. त्यामुळे किमान पती-पत्नी दोघांच्या उपजीविकेची अडचण राहत नाही. परंतु शेतकऱ्यांची अवस्था फारच कठीण आहे. अगोदरच शेतकरी कुटुंब अडचणीत अन् वृद्ध शेतकऱ्यांची फारच अवघड. त्यामुळे पेन्शन सुरू करावी. - जालिंधर लांडेजि. प. कृषी समिती सभापती