शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

coronavirus; पुणेरी आयटीयन्स्चे वर्क फ्रॉम सोलापूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:16 AM

मुलं आली घरी : दिवसभर लॅपटॉपसमोर तरीही पालकांनी व्यक्त केलं समाधान

ठळक मुद्देघरातील कुटुंबीयांना वेळ देता येईल या उद्देशाने हे आयटीयन्स सोलापुरात आलेकोरोनाच्या आजार पसरु नये यासाठी शासनाने वर्क फ्रॉम होमचा आदेश दिलासोलापुरातील आपल्या घरातून काम करणे अधिक आनंददायक

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : दिवाळी-दसºयाला घरी येणारा आमचा मुलगा यंदा मार्च महिन्यातच घरी आला आहे. त्याला मनासारखी सुट्टी मिळाली नसली तरी तो आमच्या डोळ्यासमोर असल्याचे समाधान आहे. नेहमी पुणे -मुंबईत काम करणारे मूळचे सोलापूरकर तरुण वर्क फ्रॉम होम या नियमामुळे सोलापुरातील आपल्या घरातून काम करत असताना त्यांच्या पालकांनी अशी प्रतिक्रिया दिली.

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचे काम तसे क्लिष्ट असते. त्याला वेळ आणि एकाग्रता लागते. तशा पद्धतीने सॉफ्टवेअर कंपन्यांकडून हे काम करुन घेतले जाते. कोरोनाच्या आजार पसरु नये यासाठी शासनाने वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. बहुतांश कंपन्या या आदेशाचे पालन करताना दिसत आहेत. पुण्यातील आपल्या घरातून हे काम करण्यापेक्षा सोलापुरातील आपल्या घरातून काम करणे अधिक आनंददायक होऊ शकते. 

घरातील कुटुंबीयांना वेळ देता येईल या उद्देशाने हे आयटीयन्स सोलापुरात आले आहेत. याचा सर्वात जास्त आनंद जर कुणाला होतोय तर तरुण/तरुणीच्या कुटुंबीयांना.सण, उत्सव, वाढदिवस, घरगुती कार्यक्रम या सारख्या कारणाने सोलापुरात येणाºया आयटीयन्सला ही चांगली संधी मिळाली आहे. तसे पाहायला गेले तर पुण्यातील घरात देखील काम करता येऊ शकते. पण पुण्यामध्ये सोलापूरच्या तुलनेने कोरोनाचा प्रसार जास्त झाला आहे. शहरात अद्याप एकही कोरोना आजार असलेला रुग्ण नसल्याने तुलनेने सोलापूर हे सुरक्षित आहे. 

फोनवरुन विचारपूस आता बंद- पुण्यामध्ये कोरोनाचा जास्त परिणाम दिसत आहे. यामुळे सोलापुरातील पालक हे रोज फ ोन करुन आपल्या मुलांच्या आरोग्याची विचारपूस करत आहेत. मास्क लावण्याच्या सल्ल्यापासून रोज हात कधी, किती वेळा आणि कशा पद्धतीने धुवायचे याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, आता पुण्यातील आयटीयन्स हे सोलापुरातूनच काम करत असल्याने विचारपूस करण्याचे आता बंद झाले आहे. आपला मुलगा/मुलगी हे डोळ्यासमोरच असल्याने कोरोनाविषयी चिंता मिटली आहे.

वर्क फ्रॉम होमची संधी आल्यानंतर सोलापुरातील घरातून काम करणे हा चांगला आॅप्शन होता. मी सोलापुरातून काम करु शकतो याची कल्पना आई-बाबांना दिल्यानंतर त्यांना याचा आनंद झाला. सोलापुरात कोरोनाचा आजार नसल्याने येथे यावे असे त्यांनाही वाटले. म्हणून वर्क फ्रॉम होमचा आदेश दिल्यानंतर मी लॅपटॉपसह आपले गरजेचे साहित्य घेऊन सोलापुरातील घर गाठले. - गणेश कुलकर्णी, सॉफ्टवेअर इंजिनिअर

पुण्यापेक्षा सोलापूरचे वातावरण चांगले आहे. येथे कोरोनाची भीती कमी असल्याने सोलापुरातून काम करणे शक्य आहे का असे मुलाला विचारले. त्यानेही होकार दिला. त्याचा दिवसातील बहुतांश वेळ हा कामात जात असला तरी दोनवेळचे जेवण एकत्र होते. सायंकाळी आम्ही सगळे गप्पा मारतो. बाहेर न जाता एकमेकांना वेळ देण्यात जास्त आनंद मिळत आहे.-गौरी भोसले, पालक

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याlaptopलॅपटॉपPuneपुणे