पानगाव : बार्शी तालुक्यातील पानगाव येथे एसटी बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने नामदेव तुकाराम मोरे या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला़ हा अपघात सोमवारी रात्री ९च्या सुमारास पानगाव बसथांब्यावर घडला़बार्शीकडून सुर्डीकडे जाणारी बस(एमएच१२-सीएच ८७९६) पानगाव येथे थांबली होती़ प्रवाशांचा चढ उतार संपल्यानंतर बस निघताच थांब्यावर एकच गलका झाला़ बस मागील चाकाखाली आल्याने नामदेव मोरे गंभीर जखमी झाले़ त्यांना तातडीने बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले़बसचे चालक अरूण घोळवे यांनी पोलिसांत फिर्याद दिली़ वैराग पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार जगदाळे आणि बिरुदेव हजारे पुढील तपास करत आहेत़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}