शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या बाजारपेठेत पोहोचले उडगीतील कलिंगडं; ५८ दिवसात घेतले ९ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:21 IST

बसवराज कोळी यांची यशोगाथा; अचूक व्यवस्थापन अन् खतांची योग्य मात्रा देत चार एकरात घेतली नऊ लाखांची कलिंगडं

ठळक मुद्दे ५८ दिवसांनंतर कलिंगडं विक्रीसाठी तयार झाली, थेट गुजरातच्या बाजारपेठेत मागणी ९ रुपये दराने एकूण १०४ टन उत्पादन निघाले़ त्यापासून ९ लाख ३६ रुपयांचे उत्पन्न मिळालेपहिल्या वर्षी ३ लाख, दुसºया वर्षी ४ लाख आणि तिसºया वर्षी ५८ दिवसांत विक्रमी ९ लाख ३६ हजार रुपये उत्पन्न

रेवणसिद्ध पुजारीउडगी : पारंपरिक पिकांना फाटा देत एका तरुणाने चार एकर माळरानावर ५८ दिवसात ९ लाख रुपयांचे कलिंगड पीक घेतले आहे़ लागवडीनंतर सलग १५ दिवस रासायनिक खतांची योग्य मात्रा देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिद्द, चिकाटीने १०४ टन फळ घेण्याची किमया साधली आहे.

बसवराज कोळी (उडगी, ता. अक्कलकोट) असे त्या युवा जिद्दी शेतकºयाचे नाव आहे. प्रबळ इच्छाशक्ती अन् कृषी कर्तृत्वाच्या जोरावर आज कलिंगडाचा मास्टर म्हणून बसवराज यांची परिसरात ओळख निर्माण झाली आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या बसवराज यांच्या घरची परिस्थिती ही बेताचीच होती. त्यांना वडिलोपार्जित शेती आहे. शेतामध्ये पाण्याचे स्रोत नव्हते़ ५०० फूट खोल बोअर मारल्यानंतर दोन ते अडीच इंच पाणी लागले. या पाण्यावरच त्यांनी कलिंगडाची शेती फुलवली.

पहिल्या वर्षी ३ लाख, दुसºया वर्षी ४ लाख आणि तिसºया वर्षी ५८ दिवसांत विक्रमी ९ लाख ३६ हजार रुपये कलिंगड पिकाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले आहे़ यावर्षी चार एकर क्षेत्रावर नांगरणी करून ६ फूट अंतराचे बेड तयार केले़ त्यावर मल्चिंग पेपर अंथरून ठिबक करून दीड फुटाच्या अंतराने कर्नाटक येथील ढुंगापूर (ता. आळंद) विजयालक्ष्मी नर्सरीतून २ रुपये ६० पैसे दराने शुगर क्वीन या वाणाची २० हजार ८०० रोपे आणून लावली. त्यानंतर ड्रिपद्वारे १९-१९ खताचा डोस एक दिवसाआड असे १५ दिवस देण्यात आला. ८ पोती डीएपी, ८ पोती निमपेंड, ४ पोती पोटारा, ४० किलो झिंग, ४० किलो फेरस, २० किलो पोरेट रासायनिक खते वापरली़ त्यानंतर आवश्यकतेनुसार १२६१, १३०४५, ०५२३४ खतांचा डोस दिला़ तसेच वेळोवेळी औषधांची फवारणी करून बागेची जोपासना केली. 

गुजरातच्या बाजारपेठेत -  ५८ दिवसांनंतर कलिंगडं विक्रीसाठी तयार झाली. थेट गुजरातच्या बाजारपेठेत मागणी झाली. विक्रीसाठी कलिंगडं ट्रकमधून पाठवण्यात आली. ९ रुपये दराने एकूण १०४ टन उत्पादन निघाले़ त्यापासून ९ लाख ३६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी २ लाख ६० हजार इतका खर्च केला आहे. 

केवळ भावजी बसवराज टपाले यांच्याकडून अचूक व्यवस्थापनाचे तंत्र अवलंबले़ योग्य नियोजनाबरोबर मार्गदर्शनाने यावर्षी विक्रमी उत्पादन घेण्यात यश आले़ कलिगंड हे कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. आता लगेच बेड न बदलता त्यावरच पुन्हा एकदा कलिंगड लागवड करतोय.        - बसवराज कोळी, कलिंगड उत्पादक, उडगी 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीfruitsफळे