चैत्री यात्रा रद्द; विठ्ठल धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 01:55 PM2020-03-29T13:55:22+5:302020-03-29T13:57:52+5:30

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार एक कोटी रुपये; महाराष्ट्रातील रूग्णांसाठी धावला विठुराया...

Friendship trip canceled; Vitthal ran to the aid of coroners | चैत्री यात्रा रद्द; विठ्ठल धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला

चैत्री यात्रा रद्द; विठ्ठल धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीला

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिर समितीने घेतला निर्णय चैत्री यात्रा रद्द; भाविकांनी पंढरपूरला न येण्याचे केले आवाहनगरिबांच्या मदतीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज

पंढरपूर :  कोरोना व्हायरस (कोविड-१९) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने चैत्री यात्रेत गर्दी झाली तर अनेक भाविकांना हा रोग होऊ शकतो. यामुळे चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. तसेच कोरानाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी शासनाला मुख्यमंत्री निधी म्हणून १ कोटी रुपयांची मदतही मंदिर समितीच्यावतीने देण्यात येत असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी सांगितली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर १७ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. ०४ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरत असून, या यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातून येतात. केंद्र शासनाने १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केला आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवास करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे, अशा पार्श्वभूमीवर एवढ्या मोठया प्रमाणावर पंढरपूरात भाविक आले तर, कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेवून मंदिर समितीने चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र या कालावधीत श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे परंपरनेनुसार येणाऱ्या सर्व दिंडया व सर्व पायी येणाऱ्या वारकरी भाविकांनी यात्रा रद्द झाली असल्याने कृपया कोणीही श्रीक्षेत्र पंढरपूरला येऊ नये, असे  श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरस (कोविड–१९) चा वाढता प्रभाव लक्षात घेता, राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने प्रशासनास मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

पंढरपूर शहर परिसरातील बेघर व निराधार नागरिकांसाठी फुड पॅकेट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच मा.राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाजी गरज आहे, ही बाब विचारात घेवून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने “मुख्यमंत्री सहायता निधी"ला रक्कम १ कोटी मदत देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

सदरचे पत्रक श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे मा सदस्य सर्वश्री आ. सुजितसिंह ठाकूर, आ.रामचंद्र कदम, श्री.संभाजी शिंदे, श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अँड.माधवी निगडे, ह.भ.प प्रकाश जवंजाळ, शभागवतभुषण अतुलशास्त्री भगरे, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर  सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Web Title: Friendship trip canceled; Vitthal ran to the aid of coroners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.