जैसी करणी वैसी भरणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 12:14 PM2020-04-06T12:14:39+5:302020-04-06T12:16:24+5:30
वाचक हो, लक्षात ठेवा ‘चांगले केले तर चांगलेच होते’. ‘वाईट केले तर वाईटच होते’.
Next
कोयनेचे ‘दार’ उघडले : जायकवाडीत आवक वाढणार
मुंबई : सुरुवातीला दडी मारलेल्या पावसाने नंतरच्या काळात चांगली हजेरी लावल्याने राज्यातील बहुतांश धरणो भरली असून, शनिवारी कोयना धरणाचे सहा दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले, तर जायकवाडीमध्ये 32 टक्के जलसाठा झाला आह़े गेल्या काही दिवसांत नऊ धरणो पूर्णपणो किंवा जवळजवळ पूर्ण भरली होती़ गेल्या दोन दिवसांतील चांगल्या पावसाने जायकवाडी आणि कोयना या आणखी दोन प्रमुख धरणांचा जलसाठाही चांगलाच वाढला आह़े
कोयना धरणात सध्या 99.595 टीएमसी (99.47 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणात सध्या 22 हजार 683 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी सकाळी सहा वाजता धरणाचे सहा दरवाजे दीड फुटावर उचलून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूकरण्यात आला.
वक्री दरवाजांतून 14 हजार 134 क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून 2 हजार 111 क्युसेक याप्रमाणो एकूण 16 हजार 245 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. संततधार पावसामुळे ओढे, नाले आणि कपना नदीत पाणी वाढले आहे. यामुळे कोयना परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. संगमनगर धक्का पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. यामुळे नदीपलीकडील 35 गावांचा संपर्क तुटला आहे. तर नाशिक व अहमदनगर जिलत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तेथील धरणातून मोठय़ा क्षमतेने विसर्ग सुरू झाला आहे. शनिवारी जायकवाडी धरणात 22क्5क् क्युसेक्स क्षमतेने आवक झाली. वरील धरणातून होणारा विसर्ग पाहता आवक वाढण्याची शक्यता आहे. धरणात शनिवार्पयत 32 टक्के जलसाठा झाला असून, हे प्रमाण 33 टक्क्यांवर गेल्यावर सिंचनासाठी पाणी देता येणार असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.जायकवाडी धरणाची एकूण जलक्षमतक 1522 फूट असून 6 सप्टेंबर रोजी पाणी पातळी 15क्6.5क् फुटार्पयत गेली होती. धरणात एकूण जलसाठा 1431.386 द.ल.घ.मी. झाला असून यापैकी 693.28क् द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा आहे.
मराठवाडय़ाला दिलासा
भंडारदरा :1क्क्}
निळवंडे : 1क्क् }
मुळा-87.51}
दारणा-97.55}
गंगापूर-96.53}
करंजवन-79.98}
नांदूर मधमेश्वर-89}
ओझरखेड-46.65}
पालखेड-9क्.71}.