शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिकअपची पाठीमागून धडक बसल्याने वृध्द ठार; सोलापुरातील घटना

By रवींद्र देशमुख | Updated: July 18, 2024 17:13 IST

शौचालयावरून घरी जात असलेल्या एका वृद्धाचा मागे येत असलेल्या पिकअपची धडक बसून  मृत्यू झाला असल्याची घटना नेरले येथे घडली आहे.

रवींद्र देशमुख,सोलापूर/करमाळा : शौचालयावरून घरी जात असलेल्या एका वृद्धाचा मागे येत असलेल्या पिकअपची धडक बसून  मृत्यू झाला असल्याची घटना नेरले येथे घडली आहे.

राजाराम केरू गोफणे (वय ८१, रा. नर्ले, ता. करमाळा) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. यामध्ये निष्काळजीपणे पिकअप मागे घेतल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ प्रल्हाद नाडकर (रा. लोणी, ता. माढा, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. बिरुदेव राजाराम गोफणे (वय ३०, व्यवसाय पुणे येथे खासगी नोकरी) यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.

मृत्यू झालेल्या गोफणे यांचा मुलगा बिरुदेव यांनी फिर्यादीत म्हटले की, "सकाळी वडील राजाराम हे शौचालयावरून घरासमोर आले होते. तेव्हा पिकअप चालक नाडकर याने निष्काळजीपणे वाहन मागे घेतले. त्यात गोफणे हे गंभीर जखमी झाले. बहीण छबा बबन वायकुळे यांनी मला याची माहिती दिली. त्यानंतर मी पुणे येथून नेरले येथे येण्याची तयारी करत होतो. दरम्यान काही वेळातच पुनः बहिणीने फोन करून सांगितले की, वडिलांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले".

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPoliceपोलिस