शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. पदाधिकार्‍यांनी गमावला अधिकार

By admin | Updated: May 27, 2014 00:40 IST

ग्रामविकास निधी: सीईओंनी घातली जिल्हाधिकार्‍यांच्या बांधकाम परवान्याची अट

सोलापूर: जिल्हाधिकार्‍यांच्या बांधकाम परवान्याची नवी अट घातल्याने ग्रामपंचायतीच्या हक्काच्या जिल्हा परिषदेकडील निधी वाटपावरील हक्कही पदाधिकारी गमावून बसले आहेत. अधिकारी नाही, अधिकारी नाही, अशी ओरड करणार्‍या पदाधिकार्‍यांपुढे हे नवे संकट प्रशासनाने उभे केले आहे. जिल्हा ग्रामनिधीसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायती स्वत:च्या उत्पन्नातून दरवर्षी रक्कम जमा करतात. ही रक्कम दरवर्षी वाढत आहे. या निधीतून ग्रामपंचायतीच्या मागणीप्रमाणे अल्प व्याजदराने कर्ज दिले जाते. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आतापर्यंत या निधीतून व्यापारी गाळ्यासाठीच कर्ज घेतले आहे. मागील काही वर्षांपासून कर्ज मागणीसाठी ग्रामपंचायती पुढे येण्याचे प्रमाण कमी झाले असतानाच मागणी करणार्‍या ग्रामपंचायतीला सहज कर्ज मिळत नाही. एखाद्या ग्रामपंचायतीची मागणी आली तरी त्याला प्रशासनाकडून आडकाठी आणली जाते. असाच प्र्रकार डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेतील मंजूर प्रकरणाबाबत झाला आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत वडाळा (उत्तर सोलापूर) व भंडारकवठे (दक्षिण सोलापूर) या गावांसाठी व्यापारी गाळ्यासाठी कर्ज अनुदान मंजूर केले आहे. वडाळ्यासाठी १७ लाख ३२ हजार व भंडारकवठ्यासाठी १८ लाखांचे कर्ज मंजूर केले आहे. हे करीत असताना तत्कालीन सीईओ तुकाराम कासार यांनी जिल्हाधिकार्‍यांचा बांधकाम परवाना घेण्याची अट घातली आहे. आता बांधकाम परवाना घेण्याची अट असल्याचे व बांधकाम परवान्याचे किचकट नियम पाहता व्यापारी गाळे नको असे म्हणण्याची वेळ आली आहे.

---------------------------------

सरकारने सर्वच प्रशासनाच्या हवाली केले आहे. खेड्याकडे चला असा नारा सरकार देते, परंतु खेड्याच्या विकासात काटे पेरण्याचे काम नियमाच्या माध्यमातून केले जाते. यामुळे सत्ताधार्‍यांना जनतेने फटकारले असून सहज कामे होतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे. - बळीराम साठे माजी जि. प. अध्यक्ष

----------------------------------------------

सहा गावांचे प्रस्ताव प्रलंबित मुस्ती, बोरामणी, दर्गनहळ्ळी (दक्षिण सोलापूर), औंढी (मोहोळ), मरवडे व माढा या ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच प्रस्तावांची तपासणी झाली असून पात्र असूनही ते मंजूर करताना प्रशासन खोच मारण्याची शक्यता आहे.