शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनपात मुंडेंच्या आठवणींना उजाळा

By admin | Updated: June 18, 2014 01:06 IST

शोकप्रस्तावानंतर सभा तहकूब: मुंडे यांचे स्मारक करण्याची नरोटे यांची मागणी

सोलापूर: भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना महापालिका सभागृहात उजाळा देण्यात आला़ भाजप-सेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बसपाच्या नगरसेवकांनी मुंडेंबद्दल भावना व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली़महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी आयोजित केली होती़ सभेच्या सुरुवातीला महापौर अलका राठोड यांनी दुखवट्याचा प्रस्ताव मांडला़ एक कुशल संघटक हरपला, त्यांच्यामुळे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली असल्याची भावना महापौर अलका राठोड यांनी व्यक्त केली़ त्यानंतर सभागृहात अनेक नगरसेवकांनी मुंडे यांच्या आठवणींनाा उजाळा दिला़ मुंडेसाहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते़ त्यांना नुकतेच ग्रामविकास खाते मिळाले होते, ते हयात असते तर निश्चित त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा बदलला असता, असे मत मोहिनी पतकी यांनी व्यक्त केले़ माझ्या आणि वल्याळ कुटुंबीयांच्या जडणघडणीमध्ये फक्त मुंडे साहेबांचाच वाटा असल्याचे नागेश वल्याळ म्हणाले़ अभिनंदनाचा ठराव मांडण्याऐवजी शोकप्रस्ताव मांडण्याचे दुर्दैव आले, मुंडे साहेबांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे अशोक निंबर्गी म्हणाले़ यावेळी बसपाचे आनंद चंदनशिवे, इंदिरा कुडक्याल, अनिल पल्ली, सुशीला आबुटे, शोभा बनशेट्टी, दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे, चंद्रकांत रमणशेट्टी, भीमाशंकर म्हेत्रे, जगदीश पाटील आदींची भाषणे झाली़ -----------------------पंकजा मुंडेंना बिनविरोध खासदार करा- कोठेगोपीनाथ मुंडे हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते़ बहुजन समाजातील नेता म्हणून त्यांनी कौतुकास्पद काम केले़ त्यांचे काम प्रेरणादायी असून शहरात त्यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी केली तर मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना बिनविरोध खासदार म्हणून निवडून द्यावे आणि त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी भावना देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली़