Ola Electric Scooter Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:42 IST2026-01-21T16:40:54+5:302026-01-21T16:42:48+5:30

Solapur Ola Electric Scooter Fire News: सोलापूरमधून एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

Caught on Cam: Father and son jump for life as Ola Electric scooter catches fire in Solapur | Ola Electric Scooter Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला!

Ola Electric Scooter Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरनं अचानक घेतला पेट; बापानं मुलासह उडी मारल्यानं अनर्थ टळला!

सोलापूर शहरात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याची एक धक्कादायक घटना समोर आली. बापाने मुलासह उडी मारल्याने अनर्थ टळला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती आपली ओला स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी करून मुलाची वाट पाहत असल्याचे दिसते. मुलगा फूटबोर्डवर चढताच आणि वडील गाडी सुरू करणार इतक्यात स्कूटरच्या सीटखालून धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित व्यक्तीने क्षणाचाही विलंब न लावता मुलाला स्कूटरपासून दूर केले आणि स्वत:ही लांब झाला.

काही सेकंदातच धुराचे रूपांतर आगीत झाले आणि टायर जळू लागले. सुदैवाने, आजूबाजुच्या लोकांनी तात्काळ धाव घेऊन पाणी टाकल्याने आग अटोक्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेत बाप-लेक थोडक्यात बचावले आहेत.  या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, तांत्रिक तज्ञांच्या मते ईव्ही गाड्यांना आग लागण्यामागे काही प्रमुख कारणे असू शकतात. 

या घटनेवर ओला इलेक्ट्रिकने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यापूर्वी अशा घटनांनंतर कंपनीने स्पष्ट केले होते की, त्यांचे बॅटरी पॅक जागतिक मानकांनुसार असून अनेक सुरक्षा चाचण्यांनंतरच ते बाजारात आणले जातात. पुण्यात आणि बंगळुरूमध्येही यापूर्वी ओला स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या.

Web Title : ओला इलेक्ट्रिक स्कूटर में आग; पिता-पुत्र सुरक्षित!

Web Summary : सोलापुर में ओला इलेक्ट्रिक स्कूटर में आग लग गई। पिता और पुत्र बाल-बाल बचे। घटना ईवी की सुरक्षा पर सवाल उठाती है। त्वरित बचाव और सामुदायिक मदद से आपदा टली।

Web Title : Ola Electric Scooter Fires Up; Father, Son Escape Unharmed!

Web Summary : In Solapur, an Ola electric scooter caught fire. A father and son narrowly escaped. The incident raises safety concerns about EVs. A quick escape and community help averted disaster.