सोलापूर : होटगी रोडवर अंत्रोळीकरनगर भाग -२ मध्ये दिलीप गोविंद पाटील (वय ५२) यांचे घर फोडून चोरट्यांनी १,५६००० रुपयांचे दागिने पळविल्याची घटना सोमवारी पहाटे घडली़ फिर्यादी दिलीप पाटील हे १७ मे रोजी सकाळी ६़३० वाजता घर बंद करुन बाहेरगावी गेले होते़ दरम्यान चोरट्यांनी पाटील यांच्या घराच्या वॉलकंपाउंडवरुन आत प्रवेश केला़ दरवाजाचा कुलूप कोयंडा तोडून सोन्याच्या अंगठ्या, कर्णफुले, सोन्याचे पदक आणि रोख पाच हजार रुपयांसह १ लाख ५६ हजारांचा ऐवज पळविला़ या घरफोडीची विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास फौजदार डी़ बी़ राठोड करीत आहेत़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}