मोठी बातमी; सोलापूरचा पारा ४२.५ अंशांवर;  सूर्य ओकतोय आग, जनजीवन विस्कळीत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:43 IST2026-04-13T18:42:50+5:302026-04-13T18:43:02+5:30

​गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

Big news; Solapur's temperature at 42.5 degrees | मोठी बातमी; सोलापूरचा पारा ४२.५ अंशांवर;  सूर्य ओकतोय आग, जनजीवन विस्कळीत !

मोठी बातमी; सोलापूरचा पारा ४२.५ अंशांवर;  सूर्य ओकतोय आग, जनजीवन विस्कळीत !

आप्पासाहेब पाटील/सोलापूर : सोलपूरसह राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून आज तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. आज दुपारी कमाल तापमानाची नोंद ४२.५° सेल्सिअस (१०८.५° फॅरनहाइट) इतकी झाली, ज्यामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम झाले आहेत. ​गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आजची आकडेवारी पाहता उन्हाच्या तीव्रतेने उच्चांक गाठला आहे. 


​सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होत आहे. दुपारी १२ ते ४ या दरम्यान तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर गेल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हवेतील आर्द्रता कमी (२८%) असल्याने कोरड्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूरमध्ये उन्हाचा तडाखा आता असह्य होऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूरचे तापमान ४१.६°C ते ४२.५°C च्या दरम्यान स्थिरावले असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. ​सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागतात आणि दुपारी १२ वाजेपर्यंत तापमानाचा पारा चाळीशी ओलांडतो. यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत सोलापूरच्या प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, उष्म्यापासून बचावासाठी शहाळी, ताक आणि शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढली आहे.

Web Title : सोलापुर में पारा 42.5°C पर; भीषण गर्मी से जनजीवन अस्त-व्यस्त

Web Summary : सोलापुर में तापमान 42.5°C तक पहुंचा, जिससे जनजीवन अस्त-व्यस्त हो गया। गर्मी की लहर तेज, दोपहर में सड़कें सुनसान। अगले सप्ताह भी गर्मी जारी रहने की संभावना है।

Web Title : Solapur Scorches at 42.5°C; Heatwave Disrupts Daily Life

Web Summary : Solapur sizzles as temperature hits 42.5°C, disrupting daily life. Heatwave intensifies, streets empty during peak hours. Expect continued high temperatures next week.