शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पोलीस गाडीत बीअर पार्टी; कॉन्स्टेबलसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:30 AM

'केतन' चा उपद्व्याप चालकाला भोवला; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली कठोर भूमिका

ठळक मुद्देसोलापूर शहर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची कडक भूमिकापोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरूसंचारबंदी काळात सोलापूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सोलापूर : कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात, चक्क जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस गाडीत बसुन बिअर पिताना व बिर्याणी खातानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल सह तिघांविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.      पोलीस कॉन्स्टेबल विनोद सूर्यकांत दंतकाळे (नेमणूक मोटार परिवहन विभाग, पोलीस आयुक्तालय), केतन श्रीकांत कसबे (रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट सदर बझार), राहुल गेनबा शिंदे (रा. टिकेकरवाडी होटगी रोड सोलापूर), सुमेध अशोक वाघमारे (रा.मल्लिकार्जून नगर, यशराज नगर अक्कलकोट रोड सोलापूर )  असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. केतन कसबे याने संचारबंदी असताना पोलीस गाडीतुन फिरताना, बिअर पिताना व बिर्यानी खातानाच्या व्हिडीओचे फेसबुकवरून लाईव्ह केले होते.       हा प्रकार फेसबुकवर पाहिल्यानंतर सर्वांना अश्चर्याचा धक्का बसला. चक्क पोलीस गाडीत बसुन हा प्रकार घडत असल्याचे पाहुन अनेकांनी कमेंटस देखील केले. हा प्रकार पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या लक्षात आला. केतन कसबे याचा शोध घेऊन सदर बझार पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत केतन कसबेने लाईव्ह केलेली पोलीस गाडी ही जेलरोड पेलीस ठाण्याची असल्याचे सिद्ध झाले.       चौकशीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल विनोद दंतकाळे हे जेलरोड पोलीस ठाण्याची पीसीआर-२ बोलेरो जीप (क्र. एम एच १३ पी 0२५८) वर ड्युटीवर होते. संचारबंदीत ते दि.६ एप्रिल रोजी सकाळी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत ड्युटीवर होते. दरम्यान अशोक चौकी येथून जेलरेड पोलीस ठाणे हद्दीच्या बाहेर गेले. सोबत मित्र केतन कसबे, राहुल शिंदे, सुमेध वाघमारे सोबत होते. स्वत: पोलीस कॉन्स्टेंबल विनोद दंतकाळे व त्याचे तिन मित्र शहरातील विविध भागातुन फिरून अक्कलकोट रोडवरील गोपाळनगर येथील विटाचे बांधकाम असलेल्या ठिकाणी गेले. तेथे दारू प्राशन करून जेवण केले हा सर्व प्रकार केतन कसबे याने स्वत:च्या फेसबुकवर लाईव्ह केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौघांविरूद्ध भांदवि कलम १८८, २६९, ३३६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक जे.एन. मोगल करीत आहेत. 

बिअरची बाटली आणि बिर्याणी आली कोठून?

संचारबंदीच्या काळात सर्व हॉटेल्स, वाईनशॉप व बिअरशॉप बंद आहेत. असे असताना या महाभागांना बिर्याणी आणि बिअर कोठून मिळाली असा प्रश्न निर्माण झाला आहे. बंद काळात याची कुठे विक्री केली जात आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी