शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल पूजेच्या मुलाखतीला पंढरपूरच्या पुजार्‍यांची दांडी

By admin | Updated: May 19, 2014 01:30 IST

राज्यातील १६१ उमेदवार उपस्थित

 

पंढरपूर : विठ्ठल मंदिर व परिसरातील देवतांचे रोजचे नित्योपचार करणे व पूजेसाठी रविवारी राज्यातील १६१ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. पंढरपूरमधील ३३ उमेदवारांनी मुलाखतीला दांडी मारली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील नित्योपचार कायमस्वरुपी विधिवत व्हावेत यासाठी हिंदू धर्मातील पुजार्‍यांची भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिर समितीच्या २५ एप्रिलच्या बैठकीत झाला होता. मंदिरातील पुजार्‍यांच्या १२ पदांसाठी १९९ अर्ज आले होते. त्यात महिला पुजार्‍यांचे २३ अर्ज होते. समितीने रविवारी पुजारी पदासाठी आलेल्या १४५ पुरुष व १६ महिला उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, अशी माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली. मुलाखतीत सर्व देवदेवतांचे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व दैनंदिन नित्योपचार व वर्षात येणारे सर्व नैमित्तिक उपचार व विधी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता येतात का, त्याचबरोबर श्रींची षोडशोपचारे पूजा करण्यासाठी, पोषाख व मंत्र, भजन, आरती तसेच काकड आरतीपासून शेजारतीच्या विधीपर्यंतची माहिती विचारण्यात आली. परीक्षेचा निकाल समितीच्या पुढील बैठकीत जाहीर करण्यात येईल.