Woman smash 500 liquor bottle in supermarket video goes viral | आता माझी सटकली! सुपरमार्केटमध्ये महिलेने फोडल्या ५०० दारूच्या बाटल्या, ९५ लाखांचं नुकसान

आता माझी सटकली! सुपरमार्केटमध्ये महिलेने फोडल्या ५०० दारूच्या बाटल्या, ९५ लाखांचं नुकसान

रागाच्या लोक काय काय करतात हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. कुणी रागात कुणाला मारतं तर कुणीतरी काहीतरी फोडून टाकतं. नाही तर काही लोक रागाच्या भरात कुठेतरी निघून जातात. ते म्हणतात ना की राग व्यक्तीला सैतान बनवतो. हे खरंच आहे. ब्रिटनच्या एका महिलेने रागाच्या भरात ९५ लाख रूपयांचं नुकसान करून टाकलं. या महिलेने एका सुपरमार्केटमध्ये घुसून तब्बल ५०० दारूच्या बाटल्या फोडल्या.

या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. न्यूयॉर्क पोस्टनुसार, ही घटना Aldi Supermarket जे इंग्लंडच्या Stevenage मध्ये घडली आहे. असे सांगितले जात आहे की, महिलेने जवळपास ५०० दारूच्या बॉटल तोडल्या. यांची किंमत साधारण १३०,००० डॉलर सांगितली जात आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ९५ लाख रूपये इतकी होते. तिने हे का केलं याचं कारण समजू शकलेलं नाही.

या व्हिडीओत पाहिलं जातंय की, कशाप्रकारे एका महिला धडाधड दारूच्या बाटल्या फोडत आहे. या महिलेच्या मागे सर्व दारूच्या फुटलेल्या बाटल्या दिसत आहेत. इतकेच नाही तर हे करत असताना महिलेच्या हातालाही इजा झाली आहे. सुपरमार्केटमध्ये हजर असलेल्या व्यक्तीने सांगितले की, आजपर्यंत त्याने असं कधी पाहिलं नाही. महिलेला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Woman smash 500 liquor bottle in supermarket video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.