शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या मेहंदीचा रंग हातांवर लाल कसा होतो? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:32 IST

Interesting Fact : भरपूर लोक हातांवर मेहंदी लावतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मेहंदीचा रंग हातांवर लालच का येतो? हा रंग निळा, पिवळा किंवा वेगळा का नसतो?

Why Green Henna Turn Red: मेहंदीला सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं. भारतीय लग्नांची मेहंदीशिवाय कल्पनाही करता येत नाही. लग्नांमध्ये नवरी आणि नवरदेवांच्या हातावर मेहंदी नसेल तर लग्न असल्यासारखं वाटत नाही. लग्नात किंवा सणावारांना हातांवर मेहंदी लावणं ही फार जुनी परंपरा आहे. भरपूर लोक हातांवर मेहंदी लावतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मेहंदीचा रंग हातांवर लालच का येतो? हा रंग निळा, पिवळा किंवा वेगळा का नसतो?

कसा तयार होतो मेहंदीचा रंग?

तर मेहंदीच्या पानांमध्ये एक खास प्रकारचं केमिकल असतं ज्याला लॉसोन म्हणतात. जेव्हा मेहंदीच्या पानांचं पावडर तयार केलं जातं आणि ते हातांवर लावलं जातं तेव्हा लॉसोन हातावर असलेलं प्रोटीन कॅराटिनसोबत मिळून केमिकल रिअ‍ॅक्शन करतं. या रिअ‍ॅक्शनमुळेच हातांवर लाल किंवा गर्द भुरका रंग येतो.

लालच रंग का?

लॉसोनचा नॅचरल रंग केशरी किंवा गर्द भुरका असतो. हे जेव्हा त्वचेसोबत मिळून रिअ‍ॅक्शन करतं तेव्हा याचा रंग लाल किंवा गर्द भुरका होतो. लॉसोनची रासायनिक संरचना याशिवाय वेगळा रंग निर्माण करू शकत नाही. 

कोणत्या फॅमिलीतील झाड?

मेहंदीचं झाड हे लिथ्रेसी फॅमिलीतील आहे. या झाडाची फुलं फार सुंदर आणि सुगंधी असतात. मेहंदीची पाने हिरवी असतात आणि याच पानांचा वापर केला जातो. मेहंदीच्या पानांचं पावडर तयार केल्यावर पानांमधून नॅचरल डाय लॉसोन निघतं. जेव्हा हे लॉसोन कॅरोटिनच्या संपर्कात येतं तेव्हा लाल रंग तयार होतो. 

तापमानाचाही पडतो रंगावर प्रभाव

तापमानही मेहंदीच्या रंगावर प्रभाव टाकत असतं. जर तुमच्या शरीराचं तापमान थोडं जास्त असेल तर मेहंदीचा रंग आणखी गर्द होतो. थंडीच्या दिवसात मेहंदीचा रंग थोडा हलका येऊ शकतो. मेहंदीचा रंग डार्क करण्यासाठी त्यावर लिंबाचा रस किंवा साखरेचं पाणी लावू शकता. याने त्वचेला ओलावा मिळतो आआणि मेहंदीचा रंग डार्क करण्यास मदत मिळते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके