शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! कॅनडात लाकूडतोड्या एका तासात करतो छप्परफाड कमाई, आकडा वाचाल तर नक्कीच येईल चक्कर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:01 IST

Canada Viral Video : कॅनडात डिग्रीपेक्षा आपल्याकडे असलेलं कौशल्य किती काही वेळात किती कमाई करून देतं याचं उदाहरण असलेला हा व्हिडीओ आहे.

Canada Viral Video : सोशल मीडियावर आपण पाहत असतो की, वेगवेगळ्या देशांमध्ये नोकरी करणाऱ्यांना किती पगार मिळतो, नर्सना किती पगार मिळतो किंवा वेगवेगळ्या रोजंदारीच्या कामासाठी किती पैसे मिळतात हे दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कशाप्रकारे कमी मेहनत घेऊन आणि मोठ्या शहरांमध्ये राहून काही लोक कसे पैसे कमावतात हे या व्हिडीओंमधून दाखवलं जातं. सध्या कॅनडातील एक असाच व्हिडीओ चर्चेत आलाय. ज्यात दाखवण्यात आलंय की, एक व्यक्ती म्हणजे लाकूडतोड्या झाडं तोडून एका तासात किती पैसे कमावतो. या व्यक्तीने जी काही कमाई केली ती बघून आपणही नक्कीच चक्रावून जाल.   

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. ज्यात दाखवलं आहे की, एक व्यक्ती कॅनडामध्ये झाडं तोडण्यासाठी आली आहे. या व्हिडिओत सांगण्यात आलंय की, जर आपल्याकडे योग्य कौशल्य असेल आणि आवश्यक साहित्य असेल तक ब्लू कॉलर जॉबमधूनही आपण चांगली कमाई करू शकता. या झाडं तोडणाऱ्या व्यक्तीने एका तासात ७०० डॉलर इतकी कमाई केली. भारतीय करन्सीनुसार ७०० डॉलरमध्ये साधारण ५८ हजार रूपये इतके होतात.  

व्हिडिओत विशाल सांगतो की, कॅनडात पैसा नाही असं कोण म्हणतं. या व्यक्तीने केवळ एका तासात माझ्याकडून ७०० डॉलर कमावले. तेही फक्त झाडाच्या फांद्या तोडून. मी असं म्हणत नाही की, हे काम सोपं आहे. ही व्यक्ती उन्हाळ्यातही रोज बुक असते आणि हिवाळ्यात तो बर्फ साफ करण्याचं काम करतो.  


तो पुढे सांगतोय की, हे काम मेहनतीचं तर आहेच, सोबतच कौशल्याचं आहे आणि अनुभवाचं देखील आहे. यासाठी बरंच साहित्य लागतं. जर आपल्याला हे काम येत असेल तर चांगली कमाई करू शकता. लोकांना वाटतं की, कॅनडात पैसे कमावणं अवघड आहे. पण इथे तर गवत कापणारे, बर्फ साफ करणारे आणि झाडं कापणारेही चांगली कमाई करत आहेत.  

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकांनी लिहिलं की, कॅनडासारख्या देशांमध्ये डिग्रीपेक्षा कौशल्याला जास्त महत्व असतं. एका यूजरने लिहिलं की, हेच कॅनडाचं सत्य आहे. अनेक क्षेत्रात डिग्रीपेक्षा कौशल्य जास्त वरचढ ठरतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Canadian Lumberjack Earns Big: Mind-Boggling Hourly Wage Revealed!

Web Summary : A viral video reveals a Canadian lumberjack earning $700 (₹58,000) per hour cutting trees. The video highlights the value of skilled labor in Canada, suggesting lucrative opportunities beyond traditional degree-based jobs. Many social media users are reacting to the video, many pointing out that skills trump degrees in Canada.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCanadaकॅनडा