शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:11 IST

Divya Deshmukh Emotional hug to Mother video: नागपूरच्या दिव्याने भारताची पहिली विश्वविजेती बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवल्यानंतर आईच्या मिठीत तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Divya Deshmukh Emotional hug to Mother, Women's Chess World Cup Final: नागपूरच्या अवघ्या १९ वर्षांच्या लेकीने आज जग जिंकले. महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत ३८ वर्षांच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला (Koneru Humpy) पराभूत केले. दोन्ही खेळाडूंमधील सुरुवातीचे सामने अनिर्णित राहिले होते. शनिवार आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दोघींनी गुणांची बरोबरी साधली होती. त्यानंतर आज, रॅपिड राउंडमध्ये प्रथम पांढऱ्या सोंगट्यांसह दिव्याने हम्पीची बरोबरी केली. त्यानंतर निर्णायक दुसऱ्या फेरीत काळ्या सोंगट्यांसह ७५व्या चालीला कोनेरूला माघार घेण्यास भाग पाडले. महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारी दिव्या देशमुख पहिलीवहिली भारतीय ठरली. या विजयानंतर एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला.

विजय मिळाला तो क्षण...

जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिने अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीवर विजय मिळवला. शेवटच्या काही सेकंदात दोघीही अतिशय गंभीर भावमुद्रेत दिसल्या. त्यानंतर अखेर हम्पीने हार मानली आणि विजेतेपदाबद्दल दिव्याशी हस्तांदोलन केले.

दिव्याची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर

अवघ्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुखने विजय मिळवताच पहिले आपल्या आईला घट्ट मिठी मारली. विजयाच्या आनंदामुळे दिव्या खूपच भावनिक झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच दिव्याने खूप वेळ आईला मारलेली मिठी सोडलीच नाही. दिव्या आणि तिची आई दोघींनाही भरून आले. दिव्याला आनंदाश्रू अनावर झाले. ती आईच्या मिठीत भावनिक होत व्यक्त झाली. त्यानंतर दिव्याच्या आईने दिव्याला सावरले आणि शुभेच्छा दिल्या. पाहा व्हिडीओ-

दिव्याला किती बक्षीस मिळाले?

FIDE महिला विश्वचषक २०२५च्या अंतिम सामन्यातील विजेत्या दिव्या देशमुखला सुमारे ४२ लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे ३५,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपये बक्षिसे मिळणार आहेत. याशिवाय, या खेळाडूंनी अत्यंत प्रतिष्ठित 'कॅन्डिडेट्स' स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली.

टॅग्स :Chessबुद्धीबळnagpurनागपूरViral Videoव्हायरल व्हिडिओ