शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

Corona Vaccine: कोरोना लस घेतल्यावर नपुंसक होण्याची भीती?; जाणून घ्या सत्य

By प्रविण मरगळे | Published: January 06, 2021 8:49 AM

Corona Vaccine: कोणत्याही लसीला मंजुरी देण्यापूर्वी एक प्रक्रिया पार पाडली जाते, संपूर्ण गोष्टीचा विचार करून त्याला परवानगी दिली जाते

ठळक मुद्देमंजुरी मिळालेल्या कोरोना लसीमध्ये पोर्कचे अंश असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहेआतापर्यंत जगभरातील १ कोटी लोकांना लस दिली आहे, यात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आढळलं नाहीलसीबाबत संशयास्पद मेसेज येत असेल तर तुम्ही कोरोना हेल्पलाईनवर फोन करून त्याची खातरजमा करावी

नवी दिल्ली - गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाविरुद्ध लढाईत भारताला लसीच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे. आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या कॉव्हॅक्सिन आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लसीला परवानगी दिली आहे. येत्या आठवडाभरात देशभरात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरूवात केली जाणार आहे. 

मात्र तत्पूर्वी मंजुरी मिळालेल्या कोरोना लसीमध्ये पोर्कचे अंश असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. यावर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे माजी मुख्य डॉ. डी आर गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं आहे की, अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, या अफवा चुकीच्या आहेत. कोरोना लसीबाबत असलेल्या सोशल मीडियावरील मेसेजची सत्यता पडताळल्याशिवाय कोणीही पुढे फॉरवर्ड करू नयेत असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे. 

तसेच लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की, कोणत्याही लसीला मंजुरी देण्यापूर्वी एक प्रक्रिया पार पाडली जाते, संपूर्ण गोष्टीचा विचार करून त्याला परवानगी दिली जाते, कोरोना लस घेण्याचा नकार देणाऱ्यांनी हा विचार करावा की, ते स्वत:चं नुकसान करत नाहीत तर त्यांच्या कुटुंबालाही त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे, त्यांचे नातेवाईक, मित्र सगळेच अडचणीत येऊ शकतात असंही डॉ. आर गंगाखेडकर यांनी सांगितले.

त्याचसोबत आतापर्यंत जगभरातील १ कोटी लोकांना लस दिली आहे, यात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आढळलं नाही, काही लोकांना त्रास झाला परंतु त्यांचा त्रास दूर करण्यावर नियंत्रण मिळवलं, जर लोकांनी त्या घटना लक्षात ठेवल्या तर त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुमच्याकडे कोरोना लसीबाबत संशयास्पद मेसेज येत असेल तर तुम्ही कोरोना हेल्पलाईनवर फोन करून त्याची खातरजमा करू शकतात. त्यापूर्वी हे मेसेज फॉरवर्ड करू नयेत असं डॉ. गंगाखेडकर म्हणाले. 

दरम्यान, काही ठिकाणी कोरोना लसीत पोर्कचे(डुक्कराचे मांस) घटक आहेत अशी चर्चा आहे, हे साफ चुकीचे आहे, दोन्ही लसीमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही, कोरोना लस घेणारे नपुंसक होतील ही फक्त अफवा आहे, या दाव्याला कोणताही आधार नाही, कोरोना लसीमुळे कोणीाही नपुंसक बनणार नाही, सध्या आपत्कालीन परिस्थिती आहे, अशावेळी चुकीचे मेसेज फॉरवर्ड करून गैरसमज पसरवू नये असंही डॉ. आर गंगाखेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या