अरे अरे! लग्न आहे की कुस्तीचा आखाडा, वरमालेच्या कार्यक्रमात वधु-वराची फ्री स्टाईल मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 06:53 PM2021-10-12T18:53:53+5:302021-10-12T18:54:59+5:30

एका मजेशीर व्हिडिओमध्ये, नवरा आणि नवरी स्टेजवरच आपसात असे भिडले की पाहुणेही अचंबित झाले. दोघांमध्ये पहिली वरमाला कोण कोणाच्या गळ्यात घालणार याची स्पर्धाच रंगली. हे लग्न लग्नसमारंभ कमी कुस्तीचा आखाडा वाटत होता.

bride and groom started fighting while varmala program funny video goes viral | अरे अरे! लग्न आहे की कुस्तीचा आखाडा, वरमालेच्या कार्यक्रमात वधु-वराची फ्री स्टाईल मारामारी

अरे अरे! लग्न आहे की कुस्तीचा आखाडा, वरमालेच्या कार्यक्रमात वधु-वराची फ्री स्टाईल मारामारी

googlenewsNext

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मजेशीर व्हिडिओमध्ये, नवरा आणि नवरी स्टेजवरच आपसात असे भिडले की पाहुणेही अचंबित झाले. दोघांमध्ये पहिली वरमाला कोण कोणाच्या गळ्यात घालणार याची स्पर्धाच रंगली. हे लग्नलग्नसमारंभ कमी कुस्तीचा आखाडा वाटत होता.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नसमारंभादरम्यान वरमाला समारंभात नवरी आणि नवरदेव आपसात भिडले. आधी वरमाला कोण घालणार यावरुन या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. दोघही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी झटापट करु लागले. मात्र यात दोघंही यशस्वी झाले नाहीत आणि दोन्ही वरमाला तुटून खाली पडल्या. हे दृश्य पाहून लग्नात उपस्थित सगळेच लोक हसू लागले. मात्र, नवरदेवाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, त्याला ही गोष्ट अजिबातही आवडली नसल्याचं जाणवतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या भलताच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर या मजेशीर व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. व्हिडिओला आतापर्यंत १७ हजाराहु जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अडीत हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. एका यूजरनं यावर कमेंट करत लिहिलं, आतापासूनच ही अवस्था आहे, तर लग्नानंतर यांचं काय होणार. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Web Title: bride and groom started fighting while varmala program funny video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.