Video : ७७ वर्षीय आजोबांनी चोराला बॉक्सर बनून असं काही हाणलं, सोशल मीडियातून होतंय कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 15:33 IST2020-02-19T15:22:50+5:302020-02-19T15:33:17+5:30

७७ वर्षीय आजोबांनी ज्याप्रकारे पैसे हिसकावणाऱ्या चोराला धरून हाणलं त्याचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे.

77 year old fights off thief who tried to rob him at atm video goes viral | Video : ७७ वर्षीय आजोबांनी चोराला बॉक्सर बनून असं काही हाणलं, सोशल मीडियातून होतंय कौतुक!

Video : ७७ वर्षीय आजोबांनी चोराला बॉक्सर बनून असं काही हाणलं, सोशल मीडियातून होतंय कौतुक!

एका ७७ वर्षीय आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती रात्रीच्यावेळी त्यांच्याकडून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न करत होता, त्याला या आजोबांनी बॉक्सिंग करत धुतले. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना ५ फेब्रुवारीची असून कोलचेस्टर एवेन्यूमधील एका स्टोरसमोर घडली. पोलीस चोराचा शोध घेत आहेत. मात्र, लोक यातील आजोबांचं भरभरून कौतुक करत आहेत. 

हा व्हिडीओ ब्रिटनमधील साउथ वेल्स पोलिसांनी शेअर केला आहे. त्यांनी लोकांना या चोराबाबत काही माहिती मिळाली तर सांगण्याचं आवाहन केलं आहे. अडीच लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २ हजार शेअर आणि १ हजार लाइक्स मिळाले आहेत.

यात तुम्ही बघू शकता की, आजोबा आपली कार पार्क करून एटीएममध्ये जातात. पैसे काढतात आणि अचानक एक व्यक्ती तिथे येऊन त्यांच्याकडून पैसे हिसकावतो. आजोबा त्याला धक्का देतात....नंतर एका बॉक्सरप्रमाणे चोरासोबत दोन हात करताना दिसतात. त्यांच्या याच बहादुरीचं लोक कौतुक करत आहेत.


Web Title: 77 year old fights off thief who tried to rob him at atm video goes viral