शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

४ महिला, १४ मिनिटं आणि १४ लाखांची चोरी; कल्याण ज्वेलर्समधून दागिने गायब; CCTV फुटेज पाहून पोलीसही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:51 IST

UP Crime: उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एका नामांकित ज्वेलरी शोरूममध्ये भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चार महिलांनी ...

UP Crime: उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात एका नामांकित ज्वेलरी शोरूममध्ये भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चार महिलांनी ग्राहकाच्या वेशात येऊन अवघ्या १४ मिनिटांत तब्बल १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे, या महिलांनी स्वतःसोबत लहान मुलांना आणले होते, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पण हा सगळा प्रकार दुकानातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

प्रयागराजमधील कल्याण ज्वेलर्स या शोरूममध्ये ३१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. चार अज्ञात महिला शोरूममध्ये शिरल्या आणि त्यांनी दुकानदाराला सोन्याचे कानातले दाखवण्यास सांगितले. दुकानदार त्यांना विविध दागिने दाखवण्यात व्यस्त असताना, या महिलांनी आपल्या बोलण्याने त्याला पूर्णपणे गुंतवून ठेवले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या दृश्यांनुसार, जेव्हा दुकानदार काउंटरवरून थोड्या वेळासाठी बाजूला झाला, तेव्हा एका महिलेने अत्यंत सफाईने डिस्प्ले पॅडवरील सोन्याच्या दागिन्यांचा ट्रे उचलली. तिने तो ट्रे बाजूला बसलेल्या दुसऱ्या महिलेकडे सरकवला. तिने क्षणाचाही विलंब न लावता दागिने आपल्या अंगावरील शालीत लपवले. ही सर्व चोरी इतकी वेगवान आणि प्रोफेशनल पद्धतीची होती की बाजूला बसलेल्या इतर ग्राहकांना किंवा सुरक्षारक्षकांना याची साधी कुणकुणही लागली नाही.

स्टॉक तपासताना फुटला घाम

चोरी केल्यानंतर या महिला लहान मुलांसह आरामात शोरूमबाहेर पडल्या. काही वेळाने जेव्हा शोरूममधील कर्मचाऱ्यांनी साठ्याची तपासणी केली, तेव्हा सोन्याचे काही झुमके गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या चार महिलांनी केलेल्या चोरीचा खुलासा झाला.

याप्रकरणी शोरूम व्यवस्थापकाने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी राम आश्रय यादव यांनी सांगितले की, "आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलांचा शोध घेत आहोत. शोरूमबाहेरील आणि रस्त्यांवरील कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून महिलांनी पळून जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला, याचा शोध सुरू आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Four women steal ₹14 lakh jewelry from Kalyan Jewellers in 14 minutes.

Web Summary : In Prayagraj, four women stole ₹14 lakh worth of gold jewelry from Kalyan Jewellers in just 14 minutes. Posing as customers with children, they distracted staff and swiftly concealed the loot. Police are investigating the CCTV footage.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस