शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी रस्ता काम रोखले

By admin | Updated: February 27, 2015 23:21 IST

चौकशीचे आदेश : सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर काढला तोडगा

तळेरे : मुंबई-गोवा महामार्ग ते कासार्डे फोंडा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे हे समजताच कासार्डे ग्रामस्थांनी या रस्त्यांचे काम थांबवत या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी जाब विचारत कामाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत काम चांगले करण्याची ग्वाही देत तोडगा काढला.मुंबई-गोवा महामार्गापासून ते कासार्डे पियाळी- फोंडा रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काही वर्षांपूर्वी झाले. याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला होता. यावेळी या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १३व्या वित्त आयोगानुसार या रस्त्याचे काम सुरू होते. अंदाजे २३ लाख ९४ हजार ८७९ रकमेचे अंदाजपत्रक असलेले या रस्त्याचे काम सुशील लोके यांच्या ओमटेक असोसिएट कंपनीला काम करण्यास दिले. यावेळी हे काम सुरू होण्यापूर्वी स्थानिक प्रशासन असणाऱ्या ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता काम सुरू केले. यावेळी या कामाचे सुरूवातीला काम चांगले करण्यात आले. मात्र, त्यानंतर काही थोडेसे डांबर व मोठ्या दगडांचा वापर करीत पुढील काम सुरू करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, असे समजताच बुधवारी कासार्डे ग्रामस्थांनी धाव घेत या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, सहाय्यक कार्यकारी अभियंता पी. एस. माळगावकर यांनी गुरूवारी घटनास्थळी भेट देत कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट आहे असे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर या कामाची पाहणी केली व काम निकृष्ट झाल्याची कबुली दिली. यानंतर जे काम झाले आहे ते पूर्णपणे काढून नवीन दर्जेदार काम करा, असे त्यांनी येथे कामावर असलेले कनिष्ठ स्थापत्य अभियंता पी. पी. पारकर, सहाय्यक स्थापत्य अभियंता एस. पी. कांबळी व ठेकेदार सुशील लोके यांना काम पूर्ण करून देण्याचे व कामाचा दर्जा उत्कृष्ट राखण्याचे आदेश दिले. यावेळी कासार्डे सरपंच संतोष पारकर, सुधाकर रावले, सहदेव खाडये, राकेश मुणगेकर, राकेश वालावलकर, रूपेश कानसे, निखिल पिसे, विद्याधर नकाशे, अनंत सटवकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हे काम दर्जेदार न झाल्याने काम बंद पाडले जाईल, असे सांगत हे काम दर्जेदार करावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केलीआहे. (वार्ताहर)