शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

दहा अनधिकृत वाळू कॅम्प जमीनदोस्त; तहसीलची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 16:00 IST

अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी राबविलेल्या कारवाई मोहिमेत बांदिवडे व कोईळ येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. तहसीलदार पाटणे यांनी स्वत: कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उद्ध्वस्त केले. महसूलचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच खाडीपात्रातून होडीसह कामगारांनी पोबारा केला.

ठळक मुद्देदहा अनधिकृत वाळू कॅम्प जमीनदोस्त; तहसीलची कारवाईकुणकुण लागताच खाडीपात्रातून होडीसह कामगारांनी केला पोबारा

मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी राबविलेल्या कारवाई मोहिमेत बांदिवडे व कोईळ येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. तहसीलदार पाटणे यांनी स्वत: कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उद्ध्वस्त केले. महसूलचे पथक येत असल्याची कुणकुण लागताच खाडीपात्रातून होडीसह कामगारांनी पोबारा केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनधिकृत वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मालवण तालुक्यातील खाडीपात्रांमध्ये वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी तहसीलदारांकडे प्राप्त होत होत्या.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी कारवाई मोहीम हाती घेत बांदिवडे, कोईळ या भागात धाड टाकली. यात तीन ठिकाणचे दहा वाळू रॅम्प जमीनदोस्त केले तर परप्रांतीय कामगारांच्या दोन झोपड्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या.

ही कारवाई पाटणे यांच्या नेतृत्वाखाली डी. एस. सावंत, अरुण वनमाने, मंडळ अधिकारी केशव पोकळे, तलाठी धनंजय सावंत, कोतवाल सचिन चव्हाण आदींच्या पथकाने केली.कालावल खाडीबरोबरच कर्ली खाडी पात्रातही अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासन आपला मोर्चा कर्ली खाडीत वळविणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :sandवाळूsindhudurgसिंधुदुर्गTahasildarतहसीलदार