शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

पापलेटवर मालवणातील एजंटांचा ‘ताव’

By admin | Updated: September 30, 2015 00:04 IST

कोळंबीही जाळ्यात : व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण

मालवण : पापलेट मोठ्या प्रमाणात मिळाल्याने खरेदी दारांचीही गर्दी किनाऱ्यावर झाली होती. सदरची पापलेट ६०० ते ६५० किलो दराने विक्रीला जात आहेत. स्थानिक मार्केटमध्ये पापलेट विक्रीसाठीही उपलब्ध झाली होती. मात्र बहुतांश मासळी मुंबई, गोवा, कोल्हापूर मार्केटसाठी पाठविण्यासाठी एजंटांनी खरेदी केल्याचे समजते. मत्स्य खवय्यांनाही खिशाला परवडणाऱ्या दरात पापलेट मासळी मिळाली आहे. पुन्हा अशाच पद्धतीने पापलेटसह किमती मासळी मिळेल या आशेने किनारपट्टीवरील मच्छिमार दर्यास मासेमारीस गेले आहेत. मत्स्य विभागाची गस्त वाढल्याने किनारपट्टीवरील पर्ससीन व परप्रांतीय मच्छिमारांचा धुमाकूळ काहीसा कमी झाल्याने मच्छिमारांच्या जाळीत अपेक्षित मासळी मिळाल्याचे बोलले जात आहे. मत्स्य हंगामाची दमदार सलामी झाल्यानंतरही श्रावणमास आणि गणेशोत्सवामुळे मत्स्य खव्वयांनी मासळीकडे पाठ फिरवली होती. मात्र अकरा दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन झाल्या झाल्या मच्छिमारांच्या जाळ्यात बंपर पापलेट मासळी मिळाली आहे. समुद्रात शेळीचे वारे आणि हवामानातील बदलामुळे अजूनही काही दिवस पापलेट आणि त्याच्या सोबतीला कोळंबी मासळी मिळणार असल्याची आशा स्थानिक मच्छिमारांमध्ये आहे. त्यामुळे समुद्रातील हवामानातील बदल पापलेटला अच्छे दिन येणार असून मत्स्य खवय्यांनाही खिशाला परवडणा?्या दरात पापलेट मासळी उपलब्ध होत आहे. गणेश विसर्जनानंतर मच्छिमारांच्या जाळीत मिळलेली ही मासळी पाहता मच्छीमारांसह मत्स्य खवय्यांनाही बाप्पाच पावला असल्याचे बोलले जात आहे. गेले चार दिवस पापलेट आणि कोळंबी मासळी मोठ्या प्रमाणात मिळाली असून मासळी लिलाव पद्धतीने विक्री होताना किलोने तसेच तर लॉट (जाळीत मिळालेली सर्व मासळी) पद्धतीने विक्री केली जात होती. मोठ्या प्रमाणात मागणी असलेली पापलेट मासळी मिळाल्याने मच्छिमार व मत्स्य व्यावसायिक आनंदाचे वातावरण आहे. मंगळवारीही सकाळी पापलेट मासळी मच्छिमारांच्या जाळ्यात अडकली. (प्रतिनिधी)पापलेटला ‘अच्छे दिन’गणेशोत्सव संपल्याने बाजारपेठेत आता मत्स्य खवय्यांनी मासे खरेदीसाठी गर्दी करायला सुरूवात झाली आहे. त्यातच आता चांगली मासळी मिळायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मत्स्य खवय्ये आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आणखीन काही दिवस पापलेटला ‘अच्छे दिन’ असल्याचे भाकित मच्छिमारांनी वर्तविले आहे.