शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन वाढीसाठी जलतरणचे अनावरण

By admin | Updated: January 29, 2015 00:10 IST

बांदा येथे आजपासून लोकोत्सव : चित्ररथ स्पर्धेने प्रारंभ होणार

बांदा : येथील पाटेश्वर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या बांदा लोकोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी दुपारी ३ वाजता भव्य चित्ररथ स्पर्धेने व शोभायात्रेने होणार आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी येथील तेरेखोल नदीपात्रात पर्यटन वाढीसाठी ‘पॅडल बोट’चे अनावरण करण्यात आले.२९ व ३0 जानेवारी या दोन दिवशी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फूड स्टॉल, भव्य स्टॅच्यू स्पर्धा, समुह नृत्य, शरीरसौष्ठवपटू दिनेश कांबळी यांचे शरीरसौष्ठव प्रात्यक्षिक, लहान मुलांच्या विविध स्पर्धा तसेच बांद्यातील तब्बल ७५ हून अधिक कलाकरांचा सहभाग असलेला ‘अस्मिता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राम शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.बांदा- शेर्ले तेरेखोल नदीपात्रात दोन पॅडल बोटीचे अनावरण ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार यांच्या हस्ते करण्यात आले. या बोटींमुळे येथील जलतरण पर्यटनाला वाव मिळणार आहे. तसेच नदीपात्रातील सृष्टिसांैदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने या बोटींचे अनावरण करण्यात आले. याचा लाभ बांदा शहरातील नागरिकांबरोबरच पर्यटकही घेत आहेत. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, मंदार कल्याणकर, लोकोत्सव समिती अध्यक्ष सुधीर शिरसाठ, विशांत पांगम, सनी काणेकर, प्रवीण नाटेकर, आबा धारगळकर, विशाल मळेवाडकर, राकेश केसरकर, सुनील धामापूरकर, अमित धोंगडे, डॅनी आल्मेडा, दादू कविटकर, अशोक सावंत, गिरीश नाटेकर, मनाली नाईक, विश्वजीत शेट्ये आदींसह भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)