शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

माजगाव येथे उभा टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी; आगीचे कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 6:50 PM

Fire Sindhudurgnews- माजगाव गरड येथे चालकाने आपल्या घराशेजारी पार्क करून ठेवलेल्या टेम्पोला अचानक आग लागून टेम्पोसह आतील कपडे, लोखंडी, प्लास्टिक सामान, तेल, वायर जळून खाक झाले. टेम्पोसह ५० लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून सावंतवाडी नगरपालिका अग्निशमन दल व शिवसेनेचे उपशहरप्रमुख विशाल सावंत यांच्या खासगी टँकरला चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

ठळक मुद्देमाजगाव येथे उभा टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी; आगीचे कारण अस्पष्ट तब्बल ५० लाख रुपयांचे नुकसान : पोलिसांनी केला पंचनामा
सावंतवाडी : माजगाव गरड येथे चालकाने आपल्या घराशेजारी पार्क करून ठेवलेल्या टेम्पोला अचानक आग लागून टेम्पोसह आतील कपडे, लोखंडी, प्लास्टिक सामान, तेल, वायर जळून खाक झाले. टेम्पोसह ५० लाखांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली असून सावंतवाडी नगरपालिका अग्निशमन दल व शिवसेनेचे उपशहरप्रमुख विशाल सावंत यांच्या खासगी टँकरला चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. माजगाव गरड भागात राहत असलेले टेम्पोचालक तन्वीर शेख यांनी बुधवारी कोल्हापूर येथून सावंतवाडी व बांदा येथील दुकानांचा होलसेल माल भरून दुपारी टेम्पो आपल्या घराशेजारी पार्क करून ठेवला होता. गुरुवारी तो माल वितरित केला जाणार होता. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास टेम्पोला आग लागल्याचे तेथील रहिवाशांच्या लक्षात आले.तत्काळ याची माहिती देण्यात आली. तेथील नागरिकांसह मित्र परिवार यांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. टेम्पोत प्लास्टिक वायर होती. तिने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान आग आटोक्यात आणण्यात यश आले. पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग