शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सावडाव धबधबा याही वर्षी पर्यटनासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 15:17 IST

Tourism CoronaVirus Sindhudurg : गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पर्यटकांना कोरोनाचे सावट लक्षात घेता वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मुख्य मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले.

ठळक मुद्देसावडाव धबधबा याही वर्षी पर्यटनासाठी बंदअनिश्चित कालावधीसाठी बंद

कनेडी : गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पर्यटकांना कोरोनाचे सावट लक्षात घेता वर्षा पर्यटनासाठी अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मुख्य मार्ग बंद करण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले.गेली आठ वर्षे वर्षा पर्यटनासाठी सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटकांना सावडाव धबधब्याने भुरळ घतल्यानतंर पर्यटक गर्दी करत असून गतवर्षी कोरानाचे सावट असल्याने धबाधबा बंद करण्यात आला होता. त्यामुळे गर्दी दिसली नाही. मात्र गेले एक वर्षे सोडले तर दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत असल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी हजारो पर्यटक सावडाव धबधब्यावर येत वर्षा पर्यटनांचा आनंद घेत असतात. मात्र यंदाही कोरोना संकटामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडणार असून याचा फटका येथील रोजगार मिळालेल्या चार ते पाच व्यावसायिकांना होणार असून त्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या अभ्यंगत पर्यटन करालाही मुकावे लागणार आहे.वर्षा पर्यटनांसाठी नागरीकांनी जीव धोक्यात घालून येवू नये, असे आवाहन सावडाव सरपंच अजय कदम, उपसरपंच दत्ता काटे ग्रामसेवक शशिकांत तांबे व ग्रामस्थांनी केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता जिल्हात कोरोना रूग्णसंख्या जास्त आहे. त्याच अनुशंगाने विचार करता सावडाव धबधबा पर्यटन स्थळ शासनाच्या नियमानुसार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच अजय कदम यांनी सांगितले .अनिश्चित कालावधीसाठी बंदजिल्हात कोरानाचे संकट लक्षात घेता यावर्षी सावडाव धबधबा कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने नागरीक व पर्यटकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन तसेच राज्य, इतर राज्य व जिल्ह्यातील अनेक भागातून दरवर्षी येणा-या पर्यटकांची गर्दी पाहता गतवर्षीप्रमाणे यावर्षीही अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून धबधब्याकडे जाणारा मार्गही बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्या