शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृतीला पुनरुज्जीवन मिळणे गरजेचे

By admin | Updated: January 12, 2015 00:58 IST

तानाजी चोरगे : चिपळूण येथील शतायु ग्रंथालये व ग्रंथकार अधिवेशनाचे सूप वाजले

चिपळूण : मोबाईल व व्हॉटस् अ‍ॅपमुळे वाचन संस्कृती कमी होत आहे. आई हा शब्द कालांतराने हद्दपार होतोय की काय, अशी भीती असून, वाचन संस्कृती जपण्यासाठी तिचे पुनरुज्जीवन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व साहित्यिक डॉ. तानाजी चोरगे यांनी येथे केले. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे शतायु ग्रंथालय व ग्रंथकार अधिवेशन कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे अध्यक्ष अरविंद जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह प्रकाश काणे, माजी आमदार रमेश कदम, सागर देशपांडे उपस्थित होते.ग्रामीण भागामध्ये ग्रंथालय सुरू झाले. लोकमान्य टिळक वाचन मंदिरने शतक पूर्ण केले. साहित्य निर्माण करणे हे सोपे असले तरी त्यापेक्षा प्रकाशक मिळणे व पुस्तक छापून घेणे, ते वितरित करणे हे अत्यंत जिकिरीचे काम असते. पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रंथालये करीत आहेत. मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे. वाचनामुळे नैतिक मूल्य काय आहे हे त्यांना समजेल, असेही डॉ. चोरगे म्हणाले. सार्वजनिक व खासगी वाचनालयांची आर्थिक काळजी कमी होण्यासाठी वाचनालये ही ग्रंथ विक्री केंद्रे व्हायला हवीत. त्यातूनच आर्थिक श्रेय मिळेल. पुस्तकाचा सहवास लहान मुलांनी घेण्याची गरज आहे. यामधून चांगल्या व्यक्तींची माहिती मिळेल. चांगली माणसं कळायला वेळ लागतो. बदलत्या काळात अदृश्य झालेली माणसे नव्या पिढीसमोर आणण्यासाठी काम केले पाहिजे, असे सागर देशपांडे यांनी सांगितले.