शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या चौकशीला राज ठाकरे व मनसैनिक भीक घालणार नाहीत : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:30 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीची नोटीस पाठविल्याने राज्यात मनसैनिक शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याच्या मन:स्थितीत आहेत. मात्र, निव्वळ राज ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे व आदेशाने मनसैनिकांनी शांततेने निषेध नोंदविण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्गात मनसैनिक कुडाळ येथील हॉटेल आरएसएन येथे शासनाच्या निषेधार्थ निषेध सभा  घेणार आहेत.

ठळक मुद्देईडीच्या चौकशीला राज ठाकरे व मनसैनिक भीक घालणार नाहीतमनसैनिक शासनाचा निषेध नोंदविणार :परशुराम उपरकर

कणकवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीची नोटीस पाठविल्याने राज्यात मनसैनिक शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याच्या मन:स्थितीत आहेत. मात्र, निव्वळ राज ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे व आदेशाने मनसैनिकांनी शांततेने निषेध नोंदविण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्गात मनसैनिक कुडाळ येथील हॉटेल आरएसएन येथे शासनाच्या निषेधार्थ निषेध सभा  घेणार आहेत.

सिंधुदुर्गातील सर्व विरोधी पक्षांनी या सभेत सहभाग घेऊन शासनाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे. येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे वैभववाडी तालुकाध्यक्ष तावडे, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, संतोष सावंत यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.

उपरकर म्हणाले, राज ठाकरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता पंतप्रधान व गृहमंत्री म्हणजेच मोदी - शहा जोडी कशी फसवी व जनतेची दिशाभूल करणारी आहे हे दाखवून दिले होते. जनतेला दिलेला शब्द पाळला जात नाही आणि भ्रष्टाचार कशाप्रकारे वाढला आहे हे लोकांसमोर व्हिडीओच्या माध्यमातून आणले होते. जनतेच्या मनात तीव्र संताप असतानाही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून केंद्रात भाजपाचे सरकार आले. ईव्हीएम मशीनबाबत राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन सर्व नेत्यांना एकत्र करीत सरकार कशाप्रकारे आवाज दाबत आहे हे जनतेला पटवून सांगितले होते.

त्यामुळे ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवून धमकावण्याचे प्रकार सरकार करीत आहे. मात्र, ईडीच्या नोटिसीला आपण भीक घालत नाही असे ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर मनसैनिकही ईडीच्या नोटिसीला किंमतही देत नाहीत. लोकसभेप्रमाणे राज्याच्या निवडणुकीत घोटाळे बाहेर काढून जनतेला मंत्र्यांचे व सरकारचे खरे रुप राज ठाकरे हे दाखवून देतील. याची भिती आणि धास्ती घेऊन सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीची नोटीस देऊन मनसेला घाबरविण्याचा प्रयत्न करीत असले तरी मनसैनिक मात्र नव्या जोमाने जागा झाला असून केवळ राज ठाकरे यांनी आवाहन केल्याने मनसैनिक शांत असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले. आज ठाकरे याना नोटीस बजावली. उद्या अन्य कोणत्या नेत्याला ईडीची भीती दाखविली जाईल.

जनतेने आता सरकार विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. म्हणूनच जिल्ह्यातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निषेध सभेत सहभागी होण्याचे आवाहन मनसेतर्फे करण्यात येत असल्याचे यावेळी उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग