शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देणार

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

शेतकऱ्यांना आवाहन : पॉवर ट्रिलर, मळणी यंत्र

ओरोस : कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाचा वापर लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलर व रोटरी ट्रिलर, मळणी यंत्र, यांत्रिक अवजारांना २५ ते ३५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याचा फायदा मागासवर्गीय व अन्य शेतकऱ्यांना होणार आहे.राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारीत आहे. शेतीकामासाठी मजुरांची कमतरता, मजुरीवरील जादा खर्च यामुळे शेतीवर सुधारीत कृषी अवजारे, उपकरणे, सयंत्रांचा वापर अनिवार्य झाला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे शेती मशागतीची कामे वेळेवर होत नाहीत. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या पर्यायाने पिकांचा उत्पादन खर्चही वाढतो. या बाबीचा विचार करून कृषी क्षेत्राचा दर्जा वापर वाढविण्याच्यादृष्टीने कृषी यांत्रिकीकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र पुरस्कार, राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी अभियांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सन २०१४-१५चा आर्थिक वर्षात राबविण्यात येणारे हे अभियान कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत कृषी यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या बाबीसह शासनाने मान्यता दिली असून योजनेच्या सनियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती गठीत करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. या उपअभियानात ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, रोटरी ट्रिलर, युरिया ब्रिकेट्स, अ‍ॅप्लीकेटर, स्वयंचलित भातमळणी यंत्र, फळ तोडणे यंत्र, झाडाचा आकार मर्यादीत ठेवण्याकरिता प्रुनर हार्वेस्टर ट्रॅक्टर पॉवर, ट्रिलरवर चालणारी विविध अवजारे, मळणी यंत्र, ब्रश कटर, चाकू कटर, सोलणी व फोडणी यंत्र आदी विविध अवजारांचा समावेश आहे. ही अवजारे २५ ते ३० टक्केपर्यंत प्रवर्गानुसार अनुदान वितरीत होणार आहे.यामध्ये १ लाख रूपये अनुसूचित जातीसाठी, ट्रॅक्टर ७५ हजार रूपये सर्वसाधारण, भातकापणी यंत्र अनुसूचितसाठी ९४ टक्के तर सर्वसाधारण ७५ टक्के यासह त्या त्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. कोणास याचा लाभ घ्यायचा असेल तर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दोन प्रतीत अर्ज करावा व कागदपत्रांची पूर्तता करावी. (वार्ताहर)