शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सिंधुदुर्गनगरीत खड्ड्यांमुळे घेतला तरुणाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:05 AM

सिंधुदुर्गनगरी : रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी पुलाच्या कठड्याला आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री येथील ...

सिंधुदुर्गनगरी : रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी पुलाच्या कठड्याला आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री येथील गरुड सर्कलजवळ घडली. विशाल विवेक मलबारी (वय २८) असे मृताचे नाव आहे.याबाबतची माहिती अशी की, विशाल मलबारी जिल्हा परिषद कॉलनी येधून मध्यरात्री १२ च्या सुमारास ओरोस बुदु्रक येथील घरी दुचाकीवरून जात होता. प्राधिकरण क्षेत्रातील गरुड सर्कलजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. येथील खड्डे चुकविताना विनोदचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे तो सुमारे २० ते २५ मीटर लांब जाऊन पुलाच्या कठड्याला आदळला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या कठड्याच्या खाली सुमारे ३० फुटाची दरी आहे. कठड्याला दुचाकी अडकल्याने सुदैवाने विशाल दरीत कोसळला नाही. मध्यरात्री या मार्गावर वर्दळ नसते मात्र, अपघातानंतर दुचाकीचे दिवे सुरुच राहिल्याने हा अपघात कळण्यास मदत झाली. गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार मोहन पेडणेकर यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला.प्राधिकरण अजून किती बळी घेणार ?विशाल याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकाराने नागरिक प्राधिकरणवर रोष व्यक्त करीत आहेत. प्राधिकरण अजून किती बळी घेणार ? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. किमान आतातरी प्राधिकरणाने तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहेत. याप्रकरणी मृत विशाल मलबारी याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.