शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोकण पुणेमार्गे थेट लंडन, मंगेश पारकर यांच्या झाडू विणण्याच्या कलेची मोहिनी

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 4, 2025 12:27 IST

ना कोणता आधुनिक कारखाना, ना विपणन करणारी माणसं आणि ना डिजिटल मार्केटिंग

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : कोकणात दूरगामी भागात नावीन्यपूर्ण व्यवसाय करणारे असे कित्येक जिज्ञासू व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना सोशल मीडियावरून इन्फ्लुएन्सर बनून डिजिटल मार्केटिंग करता आले नाही, त्यात यश मिळविता आले नाही. पण, यांच्या हातातील कलेने उपभोक्त्यांना मोहिनी घातली आहे.मंगेश सखाराम पारकर, नाम तो सुना नही होगा.. कुडाळ तालुक्यातील तेंडोलीसारख्या एका दुर्गम गावात राहणारा हा सर्वसामान्यांपेक्षा अतिसामान्य असा कोकणातला माणूस! जो दिवस भर शेतात राबल्यानंतर आपली कला जोपासतो आणि केरसुनी (वाडवण) अर्थात झाडू बनवतो. या झाडू मुंबई, पुणे, नागपूर तसेच महाराष्ट्राच्या बाहेर जातातच, पण चक्क पारकरांनी रचलेल्या माडाच्या हिरांना लंडनमधून ऑर्डर आली आहे. त्यांच्या झाडून कोकण, पुणे मार्गे थेट लंडनला पोहोचल्या आहेत.

लंडनमध्ये अदाकारीमाणसाकडे आयुष्यात आवड नाही, तो माणूस फक्त श्वासाने जिवंत आहे. कोकणातील ही वाडवण विणण्याची कला आज लंडनमध्ये कलाकारी दाखवत आहे. कोकणातील अनेक गुणी आणि ज्ञानवंत कलाकार किंवा उत्पादकांपैकी मंगेश पारकर त्यातील एक...

जसे आरडरी येतंत तसे बनवंतय..ना कोणता आधुनिक कारखाना, ना विपणन करणारी माणसं आणि ना डिजिटल मार्केटिंग. पण पारकरांच्या भाषेत “दिवसभर शेती केल्यावर संध्याकाळी येळ घालवूक वाडवणी वळतंय, जसे आरडरी येतंत तसे बनवतंय.”

कारागिराच्या कल्पकतेची सर नाहीपाहायला गेला तर पारकरांचा व्यवसाय हा खरं तर जागतिक पातळीचा झालेला आहे. पण, स्वतःच्या कलेचा गर्व न बाळगता स्वाभिमानाने व्यवसाय करतात. एक आवड म्हणून, कला जोपासावी म्हणून.. चिनी बनवटीच्या झाडू कितीही सुबक, टूमदार दिसली तरी कारागीराच्या कल्पक्तेची सर त्यांना नाही.

स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबुतीसाठी अतिसूक्ष्म भूमिकास्वदेशी म्हणजे फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, उद्योग समूह नाही तर मध्यम व सुक्ष्म व्यवसाय जे स्थानिक पातळीवर उत्पादन करून देशामध्येच किंवा परदेशात ते विकले जातात व आपला पैसा आपल्याकडेच पुन्हा फिरतो.. मंगेश पारकर यांच्यासारखे अनेक कारागीर आज कोकण प्रांतात, प्रदेशात, राष्ट्रीय पातळीवर स्वदेशी अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात अतिसूक्ष्म अशी भूमिका साकारतात.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणPuneपुणेLondonलंडन