शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

जग बदलायचे स्वप्न उराशी बाळगा : ठाकरे

By admin | Updated: January 12, 2015 00:58 IST

बहर युवा महोत्सवाचे उदघाटन

रत्नागिरी : जयहिंद प्रतिष्ठानच्या बहर युवा महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून आपल्या कलेचे सादरीकरण करणारे अनेकजण आज कलेच्या क्षेत्रात मानाने चमकत आहेत. आज पंधरा वर्षांच्या झालेल्या या बहर महोत्सवाद्वारे यापुढेही रत्नागिरीतील तरुण, तरुणींमधील सुप्त कलागुणांना चांगला वाव मिळेल, असे सांगतानाच छंद, कला जोपासा, जग बदलायचे स्वप्न उराशी बाळगून पुढे चला, यशाचा मार्ग निश्चित सापडेल, असे प्रतिपादन युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. येथील मराठा मैदानावर आयोजित बहर युवा महोत्सवाचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते आज (रविवार) रात्री ९ वाजता झाला. यावेळी व्यासपीठावर होममिनिस्टर मालिकेचे सूत्रसंचालक व सेनेचे सचिव आदेश बांदेकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जिंदालचे अधिकारी पुष्पराज कोल्हे, जयहिंद प्रतिष्ठानचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बहर महोत्सवाच्या उदघाटनासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आल्याने युवासेनेत चैतन्याचे वातावरण होते. मराठा मैदानात उपस्थित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. सर्वप्रथम ठाकरे यांनी शिवरायांच्या व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्यांस पुष्पहार वाहिला. या महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमास ठाकरे यांच्यासोबत आलेले आदेश बांदेकर हेसुध्दा कार्यक्रमाचे आकर्षण ठरले होते. ठाकरे म्हणाले, शिवसेनेला खरी ताकद कोकणने दिलीे. सेनाप्रमुखांवर व शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या या कोकणला आपण कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही केव्हाही हाक मारा, मी कोकणात येईन असेही ते म्हणाले. आदेश बांदेकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सुसंस्कृत, संयमी नेतृत्व सेनेला पुढे नेत आहे. युवकांनी त्यांच्या पाठीशी राहावे. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते युवासेना अहवाल, दिनदर्शिका प्रकाशन झाले. (प्रतिनिधी)