शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

..तर संघटना बांधूच नका

By admin | Updated: November 6, 2014 22:05 IST

काँग्रेसची बैठक : नीतेश राणेंच्या कानपिचक्या

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात काँॅग्रेसच्या मानहानीकारक पराभवानंतर प्रथमच सावंतवाडीत आलेल्या आमदार नीतेश राणे यांनी कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. तसेच यापुढे संघटना बांधताना मागच्या चुका करायच्या असतील तर संघटना बांधूच नका, असेही सुनावले. तसेच काही पदाधिकाऱ्यांनी भाजपाला केलेली मदत त्यांच्या तोंडावर बोलून दाखवल्याने त्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला.सावंतवाडी तालुक्यात काँग्रेसचा झालेला मानहानीकारक पराभव तसेच काँग्रेसचा उमेदवार तीन नंबरवर गेल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या युवा नेत्यांनी बुधवारच्या अनौपचारीक बैठकीत चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस संघटना बळकट करायची असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पक्षात गद्दारांना स्थान देऊ नका, आमच्याकडे चिठ्ठ्या पाठविण्यापेक्षा तुम्हीच तुमच्या पातळीवर कारवाई करा, असे मतही त्यांनी मांडले.ज्यांनी पक्षात राहून गद्दारी केली, भाजपला मदत केली. त्यांना पुढील काळात संघटनेत घेऊच नका. ते काँग्रेसमध्ये थांबून भाजपचे काम करणार असतील तर त्यांची गरज नाही. आतापासून संघटना बांधा मात्र, त्यात कोणत्याही गद्दाराला घेऊ नका, अन्यथा त्या संघटनेचा कोणताच फायदा होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन डोसभाजपला ज्यांनी मदत केली त्यातील काही पदाधिकारी उपस्थित असल्याचे आमदार नीतेश राणे यांच्या लक्षात येताच त्यांची नावे घेत त्यांना मते कमी कशी झाली, यावरुन विचारणा करत डोस देताच ते पदाधिकारी बैठकीला न थांबताच त्यांनी बाहेर जाण्याचे पसंत केले. (प्रतिनिधी)नेत्यांच्या कामाबाबत नाराजीऐन निवडणुकीच्या काळात सावंतवाडी पोलिसांसमोर मायनिंग कॉन्ट्रॅक्टर व काँग्रेस नेते यांच्यात बाचाबाची झाली होती. त्याबाबत आमदार राणे यांनी नेत्यांना फटकारल्याची चर्चा आहे. तो विषय तेव्हा न काढता नंतर काढला असता तर त्या भागातील मते कमी झाली नसती, असेही सांगितले. यापुढे प्रत्येक गोष्ट सबुरीने घेण्याचा सल्लाही दिला.