शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

संतांची विभागणी करण्याचे षड्यंत्र : सदानंद मोरे

By admin | Updated: January 11, 2015 00:25 IST

शतायू ग्रंथालये व ग्रंथालय अधिवेशन कार्यक्रम

चिपळूण : मराठी साहित्य व भाषा घडविण्यात संतांचा वाटा मोठा आहे. संत साहित्याने जीवनाचे लौकिक व अलौकिक असे भाग पाडले नाहीत. माणसाचं माणूसपण जपण्यासाठी संत साहित्य वाचणे ही काळाची गरज आहे, पण याच संतांना जातीजातीत विभागण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याची खंत ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांनी येथे आज, शनिवारी व्यक्त केली. रिकामटेकडे या टीकेवरही त्यांनी जाता-जाता शालजोडीतला टोला हाणला.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूणतर्फे शतायू ग्रंथालये व ग्रंथालय अधिवेशन कार्यक्रमात संत साहित्याने केलेले समाजप्रबोधन याबाबत प्रा. मिलिंद जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी प्रा. मोरे यांचे स्वागत केले.अध्यक्ष समर्थ असेल तर वर्षभर लोक समर्थपणे त्याच्याकडे बघतात. तो एक वैचारिक नेता असतो, असे सांगतानाच प्रा. मोरे यांनी रिकामटेकडेपणाच्या आरोपाचा समाचार घेतला. कुठलीही कला निर्माण होताना रिकामटेकडेपणा लागतो. टेकडे हा शब्द मान्य आहे, असा टोला त्यांनी भालचंद्र नेमाडे यांचे नाव न घेता हाणला.साहित्याच्या मुख्य प्रवाहाची दखल घेण्यास वेळ लागणार आहे. ही एक प्रक्रिया असते. एखादी गोष्ट सर्वच स्वीकारतील, असे होत नाही. साहित्यिक हा वेगवेगळ्या प्रवाहांची तमा न बाळगता वागत असतो. संत साहित्य हा मराठीचा मुख्य गाभा आहे. दैनंदिन जीवनाला माहिती देणारी पुस्तके सध्या जास्त खपतात. अशी उपयुक्त पुस्तके लिहिणे गरजेचे आहे. लोक कविता ऐकायला गर्दी करतात; परंतु पुस्तक खरेदी करत नाहीत. ऐकण व वाचन यात फरक असतो. काव्य संस्कृती वाढली पाहिजे, ती टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले.मराठी माणसाच्या आशा-आकांक्षा मोठ्या आहेत, याचा विचारही व्हायला हवा. आधुनिक साहित्यांनी व्यवहारात भर टाकली आहे. दलित साहित्यामध्ये वेगळेपणा आहे. यंत्रमानव व मानव यांच्यात भविष्यात युद्ध होईल. यासाठी सावध राहण्याची गरज आहे. साहित्य हे मराठी माणसाला बाजूला करू शकत नाही. मराठी माणसांच्या आशा-आकांक्षा आहेत याचा विचार साहित्यात व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)