शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

मुख्य वनसंरक्षकावर अर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप, कणकवलीच्या तत्कालीन वनक्षेत्रपालाची तक्रार, वनविभागात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 11:15 AM

कणकवलीचे तत्कालीन वनक्षेत्रपाल दिपक सोनवणे यांनीही आपल्या वरिष्ठ अधिका-यांवर अर्थिक देवाण घेवाणीचा आरोप केला आहे.

सावंतवाडी - मेळघाट मधील महिला वनक्षेत्रपाल यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतनाच आता कणकवलीचे तत्कालीन वनक्षेत्रपाल दिपक सोनवणे यांंनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा प्रभारी कार्यभार माझ्याकडून तडकाफडकी काढून घेउन तो रत्नागिरीतील अधिका-यांकडे अर्थिक देवाण घेवाणीतून दिल्याचा गंभीर आरोप कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षकावर केला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना लिहले असून, त्यांची प्रत त्यांनी मुख्यमंत्र्यानाही पाठवली आहे. या पत्राने वनविभागात खळबळ माजली असून,आता वरिष्ठ अधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.सध्या राज्यातील वनविभाग चांंगलेच चर्चेत असून,आठवड्यापूर्वी मेळघाट येथील महिला वनक्षेत्रपाल दिपाली चव्हाण यांनी चिट्टी लिहून आत्महत्या केली त्यानंतर या प्रकरणी दोषी ठरवून दोन आयएफएस दर्जाच्या अधिका-यांचे शासनाने निलंबन केले आहे.हा प्रकार ताजा असतनाच आता कणकवलीचे तत्कालीन वनक्षेत्रपाल दिपक सोनवणे यांनीही आपल्या वरिष्ठ अधिका-यांवर अर्थिक देवाण घेवाणीचा आरोप केला आहे. माझ्याकडे कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार शासनाने दिला होता.त्यात मी अतिशय चांगले काम केले माझ्या विरोधात कोणतीही लेखी तक्रार नव्हती.किंवा मला एक ही कारणे दाखवा नोटीस ही बजावण्यात आली नसतनाही माझ्याकडे कणकवली चा प्रभारी कार्यभार काढून धेतला असा सवाल सोनवणे यांंनी केला आहे.कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक क्लेंमट बेन यांच्यावर २००७ मध्ये झालेल्या लाचलुचपतच्या कारवाईचा दाखला देत सोनवणे यांंनी कणकवलीचा प्रभारी कार्यंभार हा रमेश कांबळे या रत्नागिरीतील अधिकाºयांकडे देण्या साठी मुख्यवनसंरक्षक यांंनी अर्थिक देवाण घेवाण केली आहे. अशी आपली शंभर टक्के धारणा असल्याचे सोनवणे यांनी म्हटले असून,माझी मालवण येथे कांदळवन वनक्षेत्रपाल अशी नेमणूक आहे.मालवण व कणकवली हे अंतर पंधरा किलोमीटरचे असतनाही माझ्याकडचा कार्यभार काढून तो शंभर किलोमीटर अंतरा वरील व्यक्तीकडे देणे कितपत योग्य आहे.असा सवाल ही या पत्रातून विचारला आहे.सोनवणे यांनी या आरोपांची प्रत वजा तक्रार अप्प प्रधान मुख्य वनसंरक्ष क नागपूर यांना पाठवला असून,त्यांची प्रत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच अन्य अधिकाºयांना ही पाठवली आहे.सोनवणे यांच्या या अर्थिक देवाण घेवाणीच्या आरोपावरून वनविभागातच खळबळ माजली असून,एका महिला वनक्षेत्रालाच्या आत्महत्येनंतरचे वरिष्ठावर तक्र्रार करणारे हे राज्यातील दुसरे प्रकरण आहे.या तक्रारीनंतर कोल्हापूर परिक्षेत्र मुख्य वनसंरक्षक क्लेंमट बेन यांच्याशी संर्पक केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग