BOMS doctors will appreciate the contract of the state | राज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांचे मानधन वाढणार
बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीबाबत आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना आमदार निरंजन डावखरे.

ठळक मुद्देराज्यातील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांचे मानधन वाढणारआमदार निरंजन डावखरे यांचा आरोग्य मंत्र्यांकडे आग्रह

सिंधुदुर्ग  : राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रुग्णांना सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.

कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे, त्यांच्या जागी बीएएमएस पदवीधारक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प आहे. एमबीबीएस कंत्राटी डॉक्टरांप्रमाणे बीएएमएस डॉक्टरांनाही ैसमान काम समान वेतन' या तत्वावर मानधन देण्याची आवश्यकता आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

राज्य सरकारने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (वर्ग अ) मानधनात वाढ केली आहे. त्यात एमबीबीएस डॉक्टरांचा उल्लेख आहे. मात्र, बीएएमएस डॉ्क्टरांचा उल्लेख केला नाही, याकडे आमदार डावखरे यांनी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले.
या संदर्भात आरोग्य मंत्री शिंदे यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Web Title: BOMS doctors will appreciate the contract of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.